surya mangal and shani make Trigrahi Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने गोचर करून त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग तयार करतात, ज्यांचा देशावर आणि जगावर थेट परिणाम होतो. ग्रहांचा राजा सूर्य सध्या मीन राशीत गोचर करत आहे. त्याच वेळी, कर्मदाता शनिदेव देखील मीन राशीत गोचर करत असून ते २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून ५९ मिनिटांनी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहेत, ज्यामुळे गुरु स्वामी ग्रह असणारी मीन राशीत, त्रिग्रही योग तयार होईल. हा त्रिग्रही योग १४ एप्रिलपर्यंत राहील. कारण याच दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा सूर्य, शनी आणि मंगळ एकत्र येतात, तेव्हा जीवनात मोठे चढ-उतार आणि निर्णायक बदल दिसून येतात.

त्रिग्रही योगकठोर परिश्रम, संघर्ष आणि नेतृत्वाच्या माध्यमातून यश मिळवून देऊ शकतात, तरी राग, अहंकार टाळणे आवश्यक आहे. संयम, शिस्त आणि धैर्याने, या ग्रहांची एकत्रित ऊर्जा स्वतःच्या फायद्यासाठी वापरता येईल. तर त्रिग्रही योगाचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येईल. पण, धनु, वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम दिसून येतील.

त्रिग्रही योगाचा तीन राशींवर होणार सकारात्मक परिणाम…

धनु

हा त्रिग्रही योग धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. शिवाय, हा योग तुमच्या राशीच्या कुंडलीच्या चौथ्या घरात तयार होत आहे. त्यामुळे, या काळात करिअरमध्ये प्रगती, प्रलंबित काम पूर्ण आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नशीबही तुमच्या बाजूने असण्याचे संकेत आहेत. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता, एखादी चैनीची वस्तू देखील खरेदी करू शकता. या काळात जास्त अतिआत्मविश्वास आणि घाईने घेतलेले निर्णय हानिकारक ठरू शकतात आणि जवळच्या व्यक्तीशी मतभेद होण्याचीही शक्यता आहे.

वृषभ

हा योग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. तुमच्या राशीच्या कुंडलीच्या उत्पन्न आणि लाभाच्या घरात हा योग तयार होत असल्यामुळे या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची, कुटुंबात शांतता व आनंद मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात स्थिरता दिसून येऊ शकते. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या मुलांसंबंधी चांगली बातमी मिळू शकते. पण, या काळात खर्च अचानक वाढू शकतो, जुन्या गुंतवणुकीत विलंब होण्याचीही चिंता निर्माण होऊ शकते. त्यामुळे, आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मिथुन

त्रिग्रही योगाची निर्मिती मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकते. हा योग तुमच्या राशीच्या कुंडलीच्या कर्म भावामध्ये तयार होत आहे. हा काळ तुमच्या कामात, व्यवसायात नवीन संधी घेऊन येऊ शकतो. संवाद, नेटवर्किंगचा फायदा होईल, आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. शिक्षण, स्पर्धा परीक्षांमध्ये यश तर व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ मिळू शकतो. एखादा मोठा व्यावसायिक करार होण्याचीही शक्यता दिसते आहे. पण, निर्णय घेण्यामध्ये अस्थिरता आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे चांगल्या संधी गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, संयम बाळगणे आणि काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)