Graha Gochar In May 2026: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये काही ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव १२ राशींवर पडतो. मे महिन्यातही काही महत्वाच्या ग्रहांचे गोचर होईल. मे महिन्यात सूर्य, बुध, शुक्र, मंगळ या ग्रहांचे गोचर होईल. पंचांगानुसार, ११ एप्रिल रोजी बुध मीन राशीत जाईल. या काळात मंगळ, सूर्य आणि शनी याच राशीत विराजमान असतील, ज्यामुळे चतुर्ग्रही योग निर्माण होईल. त्यानंतर १४ एप्रिल रोजी सूर्य मेष राशीत गोचर करेल आणि १९ एप्रिल रोजी शुक्र मेष राशीत गोचर करेल. ज्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल. त्यानंतर ३० एप्रिल रोजी बुध ग्रहाचा मेष राशीत प्रवेश होईल.
मे महिन्यात चमकणार ‘या’ राशींचे भाग्य
मेष (Mesh Rashi)
मेष राशींच्या व्यक्तींसाठीही मे महिना खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी देखील हा महिना खूप उत्तम सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या गोचरामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीदेखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील; ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनदेखील सुखमय असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.
कन्या (Kanya Rashi)
हा महिना कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
