Four Planet Yuti In Min Rashi : ग्रहांच्या स्थितीनुसार एप्रिल महिना खूप विशेष ठरणार आहे. या महिन्यात सुमारे ३० वर्षांनंतर मीन राशीत ४ ग्रहांची युती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा एक अत्यंत दुर्मीळ योगायोग मानला जातो. २ एप्रिल रोजी ग्रहांचा अधिपती मंगळ मीन राशीत प्रवेश करील. मंगळाच्या मीन राशीतील प्रवेशानंतर सूर्य, बुध व शनी हे ग्रहदेखील मीन राशीत प्रवेश करणार आहेत. ३० वर्षांपूर्वी मीन राशीत शनी, मंगळ, सूर्य व बुध यांची युती झालेली दिसली होती. चला जाणून घेऊया की, मीन राशीतील चार प्रमुख ग्रहांच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या लोकांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे…

मेष

या महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमच्यावर आधीच शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. त्याचबरोबर स्वामी ग्रह मंगळ तुमच्या राशीच्या कुंडलीच्या १२ व्या घरात भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या योजनांबाबत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कौटुंबिक जीवनात तणाव आणि तुम्ही बनवलेल्या काही योजना अडकून पडतील.

कन्या

मीन राशीतील मंगळ, सूर्य, शनी व बुध यांच्या युतीचा तुमच्या राशीवर नकारात्मक परिणाम होईल. सर्व ग्रह त्यांच्या सप्तम दृष्टीच्या प्रभावाखाली असतील. त्यामुळे कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंधांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्याची योजना आखणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी आणि नवीन उपक्रम सुरू करणे टाळावे.

तूळ

या महिन्यात तुम्हाला काही दिवस सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण- मंगळाची तूळ राशीवर दृष्टी असेल. या काळात तुम्हाला निष्काळजीपणा टाळावा लागेल. तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्हाला आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल.

मीन

चार प्रमुख ग्रहांची युती तुमच्यासाठी फारशी चांगली ठरणार नाही. त्यातच तुम्ही सध्या शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यातून जात आहात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. नोकरी करणाऱ्यांच्या बाबतीत बदलीची शक्यता आहे. याव्यतिरिक्त जे बेरोजगार आहेत, त्यांना नवीन नोकरीसाठी थोडा जास्त काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)