Surya Mangal Dwidwadash Yog: शौर्य, ऊर्जा आणि जमीन यांचे कारक मंगळ ग्रह तसेच वडील आणि सन्मानाचे कारक सूर्य एकत्र येऊन एक शक्तिशाली योग तयार करत आहेत. २८ मे २०२६, गुरुवारी दुपारी ०२:५५ वाजता सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून ३०° अंतरावर द्विद्वादश योग तयार करतील. अशा प्रकारच्या योगाचा ठरलेला कालावधी नसतो, पण साधारणपणे हा योग एक ते दोन आठवडे सक्रिय राहतो. चला जाणून घेऊया या योगामुळे कोणत्या ४ राशींना विशेष लाभ होणार आहे.
मेष राशी (Aries Zodiac Sign)
मंगळ आणि सूर्याचा हा योग मेष राशीसाठी खूप शुभ ठरू शकतो. करिअरमध्ये जलद प्रगती होऊ शकते. प्रमोशनच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात नवीन डील मिळू शकते. अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कोर्टातील प्रकरणांचा निकाल लागू शकतो.
सिंह राशी (Leo Zodiac Sign)
सिंह राशीसाठी हा काळ खूप चांगला ठरू शकतो. ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. कामाची प्रशंसा होईल आणि जुने प्रोजेक्ट पुन्हा सुरू होऊ शकतात. अचानक मिळालेला पैसा कर्जाच्या समस्या दूर करू शकतो. शिक्षण क्षेत्रातील लोकांना पदोन्नती मिळू शकते. कुटुंबात प्रेम वाढेल.
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac Sign)
पैशांशी संबंधित अडचणी दूर होतील आणि अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीत पद वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आरोग्यात सुधारणा होईल. शारीरिक ऊर्जा वाढेल. परदेश प्रवासाचे योग बनू शकतात. विचार सकारात्मक होतील आणि ताण कमी होईल.
मीन राशी (Pisces Zodiac Sign)
मीन राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ परिणाम देऊ शकतो. या राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील आणि सर्जनशीलता वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ चांगला असेल. व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळू शकतात. जमीन खरेदी करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
