Surya Mangal Yuti in Kanya Rashi 2023: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याच्या राशी परिवर्तनाचा राशीचक्रातील सर्व राशींवर प्रभाव पडतो. १७ सप्टेंबर २०२३ ला सूर्याचे यंदाचे महागोचर कन्या राशीत झाले आहेत. याच ठिकाणी मंगळ ग्रह अगोदरच स्थित आहेत. यामुळे सूर्य व मंगळाची युती निर्माण झाली आहे. तर आज गणेशोत्सवातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच ऋषिपंचमीला ही युती शक्तिशाली होणार आहे. सूर्य व मंगळ हे दोन्ही ग्रह अग्निप्रधान आहेत. अशामुळे काही राशींच्या भविष्य उज्वल होऊ शकतं तर काहींना चटके सुद्धा सहन करावे लागू शकतात. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य व मंगळाची युती ही ३ राशींसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. या राशींना प्रचंड मोठा धनलाभ होण्यासह प्रगतीचा सुद्धा योग आहे. या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का, पाहूया..

सूर्य मंगल युती देणार तुम्हाला बंपर लाभ?

मेष रास (Aries Rashi Astrology)

मेष राशीसाठी सूर्य मंगळ युती लाभदायक सिद्ध होऊ शकते. तुमचे आर्थिक बळ वाढू शकते. एखादा ठरवलेला मनसुबा पूर्ण होऊ शकतो. आपल्याला काम पूर्ण झाल्याने मनावरचा मोठा ताण निघून गेल्यासारखे वाटेल. कोर्टाच्या खटल्यांमध्ये आपल्या बाजूने निकाल लाही शकतो, ज्यामुळे अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक फायद्याचे नवनवे स्रोत मिळू शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या.

Budh Gochar 2024
७ दिवसांनी ‘या’ ४ राशीधारकांना मिळणार पैसाच पैसा? बुधलक्ष्मी कृपेने बदलेल आयुष्य, होऊ शकता अपार श्रीमंत
Venus Transit 2024
सोन्यासारखे उजळेल करिअर, ‘या’ लोकांच्या घरी जुलैचे २३ दिवस असेल महालक्ष्मीचा निवास, ७ जुलैपासून तीन राशींची होणार चांदी
Shukra Gochar 2024
५ दिवसांनी ‘या’ पाच राशींचा सुवर्णकाळ सुरू, हाती येणार अमाप पैसा? शुक्रदेवाच्या कृपेने होऊ शकतात श्रीमंत, तुम्हाला आहे का ही संधी?
Trigrahi Yoga in Gemini These
नुसता पैसाच पैसा! मिथुन राशीत त्रिग्रही योग; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना बनवणार धनवान
Budh Uday in Gemini
उद्यापासून ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस होणार सुरु? बुध उदय स्थितीत येताच दार ठोठावेल लक्ष्मी!
Rahu In Shani Nakshatra Gochar 2024
शनीच्या नक्षत्रात सोन्याचे दिवस, ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होणार सुरु; तुम्हाला कशी लाभेल श्रीमंती?
Tirgrahi Yog 2024
१०० वर्षांनी ३ ग्रहांची महायुती ‘या’ राशींना करणार लखपती? सुख, समृद्धी व शांती घेऊन माता लक्ष्मी येऊ शकते तुमच्या दारी
Transit of Venus in Cancer in July
देवी लक्ष्मीची होणार कृपा! जुलै महिन्यात कर्क राशीत शुक्राचे राशी परिवर्तन; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार भौतिक सुख

कर्क रास (Cancer Rashi Horoscope)

मंगळ व सूर्याची युती कर्क राशीसाठी फायदेच कायदे घेऊन येणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी देणारा हा कालावधी असणार आहे. तुमचे साहस व पराक्रम गाजवण्याची क्षमता वाढेल. धनलाभ होऊ शकतो. अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसाय वेग धरण्याची चिन्हे आहेत. तर नोकरदारांना नोकरीचे ठिकाण बदलल्यास अधिक फायदा होऊ शकतो. संतती सुखाचे संकेत आहेत.

हे ही वाचा<< गणेश चतुर्थी मंगळवारी आल्याने ‘या’ ६ राशींच्या लोकांची होणार भरभराट; गणरायासह लक्ष्मीकृपेने तुम्हीही व्हाल श्रीमंत

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)

सूर्य व मंगळ एकत्र आल्याने वृश्चिक राशीच्या व्यक्ती तन- मनाने समृद्ध होऊ शकतात. या मंडळींना जुन्या गुंतवणुकीचे व कर्माचे गोड फळ मिळू शकते. आयात-निर्यात संबंधित कामांमध्ये असणाऱ्या मंडळींना विशेष लाभ होण्याचे संकेत आहेत. तुमच्या समाजातील स्थानाला बळकट करणारी एखादी घटना घडू शकते. वाडवडिलांच्या रूपात तुम्हाला प्रचंड मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)