Surya Nakshatra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्याचा प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. राशी परिवर्तनासह सूर्याचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर होतो. सूर्य जवळपास १४ दिवसांमध्ये नक्षत्र परिवर्तन करतो. सध्या सूर्य आश्लेषा नक्षत्रामध्ये विराजमान असून, तो १६ ऑगस्ट रोजी (आज) मघा नक्षत्रामध्ये प्रवेश करील. काही राशीच्या व्यक्तींना या नक्षत्र परिवर्तनाचा खूप फायदा होणार आहे.

पंचांगानुसार, सूर्य १६ ऑगस्ट रोजी (आज) संध्याकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी मघा नक्षत्रामध्ये प्रवेश करील. २७ नक्षत्रांमध्ये मघा हे १० वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी केतू ग्रह आहे. सूर्याच्या या नक्षत्रातील प्रवेशामुळे काही राशीधारकांना करिअर, व्यवसायात यश पाहायला मिळेल.

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन या राशींसाठी खास

मेष

सूर्याचा मघा नक्षत्रातील प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारा ठरेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत आणि करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल. साहस आणि आत्मविश्वासात वाढ होईल. मित्रांची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ किंवा पदोन्नती होईल. कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण व्यतीत कराल. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कर्जमुक्ती होण्यात मदत होईल. धनप्राप्ती होईल. वैवाहिक आयुष्यात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल.

तूळ

सूर्याचा मघा नक्षत्रातील प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. व्यवसायात हवे तसे यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. जोडीदाराची प्रत्येक कामात साथ मिळेल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल, कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात प्रगती होईल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. फिरायला जायचा प्लान कराल.

हेही वाचा: उद्यापासून चांदीच चांदी; सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार मान-सन्मान, पद अन् पैसा

वृश्चिक

सूर्याचा मघा नक्षत्रातील प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही खूप भाग्यकारक ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सहयोग मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. या काळात धन व सुख-समृद्धीत वाढ होईल. भाग्याची साथ मिळेल. कुटुंबात शुभकार्ये होतील. दूरचे प्रवास घडतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. भाग्याची साथ मिळेल, कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)