Surya Nakshatra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. तसेच वेळोवेळी सूर्याचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. लवकरच सूर्य स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

पंचांगानुसार, सूर्य २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजून ५२ मिनिटांनी स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे जो ६ नोव्हेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील. स्वाती नक्षत्राचा स्वामी राहू ग्रह आहे. सूर्याचा राहूच्या नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या व्यक्तींना अत्यंत फायदेशीर ठरेल.

Diwali 2024 horoscope three zodiac signs
दिवाळी घेऊन येणार सुखाचे दिवस; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यात मिळणार भरपूर पैसा, प्रेम अन् मानसन्मान
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Weekly Lucky Horoscope 28 October to 3 November 2024
Weekly Lucky Horoscope: लक्ष्मी नारायण राजयोगाने सुरु होईल दिवाळीचा आठवडा! या राशींवर होईल लक्ष्मीची कृपा, अचानक आर्थिक लाभाची शक्यता
Shani Gochar 2025 horoscope saturn transit in meen
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये ‘या’ राशी होणार मालामाल; शनिदेवाच्या कृपेने मिळेल अमाप पैसा, पद अन् प्रतिष्ठा
Budh Nakshatra Parivartan 2024
पैसाच पैसा! बुधाच्या अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
today horoscope 10th November rashi bhavishya akshay navami 2024
Today Horoscope : अक्षय नवमीला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब चमकणार; लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर होणार का धनवर्षाव? वाचा राशीभविष्य
lucky rashi
गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे मालामाल होतील मिथुन, सिंहसह या पाच राशी, जाणून घ्या साप्ताहिक भाग्यशाली राशी

सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश

मिथुन

मिथुन राशींच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल फळ देणारे ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. तुमचे प्रेम संबंध मजबूत होतील. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मान-सन्मान वाढ होईल.

धनु

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन धनु राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. समाजात मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. भाग्याची चांगली साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल.

हेही वाचा: १५८ दिवसांसाठी मंगळ करणार कर्क राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळवता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणच्या नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल. नात्यामध्ये सुखाचे क्षण येतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader