Surya Purva Phalguni Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर नक्षत्र परिवर्तन करताना दिसतो ज्याचा थेट परिणाम राशीचक्रातील इतर राशींवर दिसून येतो. सूर्य ३० सप्टेंबर शुक्रवारला पूर्व फाल्गुनी नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. पूर्व फाल्गुनी नक्षत्राचे स्वामी ग्रह शुक्र देव आहे जे सध्या
याच नक्षत्रामध्ये विराजमान आहे. जेव्हा सूर्य या नक्षत्रामध्ये गोचर करणार त्याचा थेट परिणाम राशिचक्रातील तीन राशींवर दिसून येईल. त्या तीन राशींचे नशीब चमकू शकते. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या.
सिंह राशी (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचे नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते. या दरम्यान या लोकांचा मान सन्मान वाढू शकतो आणि या लोकांची प्रतिष्ठा सुद्धा वाढेन. त्याबरोबर या लोकांना धन प्राप्ती होऊ शकते तसेच व्यवसायात यश मिळू शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुख समृद्धीने भरलेले असेल. तसेच जोडीदाराबरोबरचे नाते अधिक दृढ आणि घट्ट होतील. जे लोक भागीदारी मध्ये व्यवसाय करत असतील, त्यांना चांगला नफा मिळू शकतो. तसेच या दरम्यान या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार.
हेही वाचा : “एक होता डोंगर….!” विद्यार्थ्यांना नाचत-गात बडबडगीत शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video चर्चेत; बालपणीचे दिवस आठवतील
मेष राशी (Aries Zodiac)
सूर्य देवाचा नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या दरम्यान या राशीच्या लोकांचा पगारवाढ होऊ शकतो. तसेच आर्थिक नवीन स्त्रोत तयार होणार. तसेच नोकरीच्या ठिकाणी या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते किंवा इतर ठिकाणाहून नोकरीची चांगली संधी मिळू शकते ज्यामुळे या लोकांच्या पगारात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. या दरम्यान व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला धनलाभ मिळू शकतो. तसेच या दरम्यान हे लोक लहान मोठ्या यात्रेला जाऊ शकतात.
तुळ राशी (Libra Zodiac)
तुळ राशीच्या लोकांना सूर्य देवाचे नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकतात. या दरम्यान या लोकांना वेळोवेळी आकस्मिक धनलाभ मिळू शकते. या लोकांच्या वाणीवर प्रभाव दिसून येईल ज्यामुळे लोक यांच्याकडे आकर्षित होतील. तसेच व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आर्थिक स्त्रोत वाढतील आणि ते त्यांच्या क्षेत्रात वर्चस्व मिळवू शकतात. तसेच या दरम्यान या लोकांना भाग्य मिळू शकतात. अडकलेली कामे मार्गी लागतील. या लोकांच्या इच्छा पूर्ण होतील. या लोकांच्या प्रतिभावान लोकांबरोबर भेटी गाठी होतील ज्याचा भविष्यात या लोकांना फायदा होऊ शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)