Sun Nakshatra Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

पंचागानुसार, २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०१ वाजून २४ मिनिटांनी सूर्य मेष राशीत राहून भरणी नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रात सूर्यदेव ११ मे २०२६ पर्यंत राहील. त्यानंतर तो कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल. भरणी हे शुक्रदेवाचे नक्षत्र असून सूर्याच्या नक्षत्रातील गोचराने काही राशींच्या लोकांना भरपूर सुख,समद्धी अन् भौतिक सुख मिळेल.

‘या’ पाच राशींवर होणार सूर्याची कृपा

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल.

मिथुन (Meen Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचे भरणी नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच, यावेळी, तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल.

कुंभ (Kumbha Rashi)

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हे सूर्याचे नक्षत्र गोचर खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. भावंडांकडून मदतीचा हात मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक गोड होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)