Sun Nakshatra Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. पंचांगानुसार, २२ जून २०२६ रोजी सूर्यदेव राहूच्या आर्द्रा नक्षत्रात गोचर करणार आहे. सूर्याचे हे परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
सूर्याचे गोचर ‘या’ राशींचे भाग्य चमकवणार
सिंह (Singh Rashi)
सूर्याचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याच्या परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल.
वृश्चिक (Vruschik Rashi)
सूर्याचे गोचर वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
कन्या (Kanya Rashi)
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
