Surya Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

पंचांगानुसार, सूर्य ५ मार्च (आज) २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ५९ मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. पूर्व भाद्रपद नक्षत्राचा स्वामी गुरू ग्रह आहे. सूर्याचा गुरू ग्रहाच्या नक्षत्रातील प्रवेश १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय अनुकूल सिद्ध होईल.

‘या’ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर मालामाल करणार

सिंह (Singh Rashi)

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे नक्षत्र गोचर अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमचे भाग्य उदयास येईल. बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल. आर्थिक परिस्थिती आधीपेक्षा सुधारेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. कष्टाचे योग्य फळ मिळेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील आणि लग्नही जुळेल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचा पूर्व भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच, यावेळी, तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)