Surya Nakshatra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. तसेच वेळोवेळी सूर्याचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. सध्या सूर्य शनीच्या पुष्य नक्षत्रामध्ये असून या नक्षत्रामध्ये सूर्य २ ऑगस्ट २०२४ पर्यंत उपस्थित असेल. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सूर्य आश्लेषा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. ज्याचा प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. सूर्य करणार नक्षत्र परिवर्तन (Surya Nakshatra Gochar 2024) वृषभ सूर्याचा आश्लेषा नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक शुभ फळ देईल. धार्मिक कार्यात मन रमेल आणि प्रत्येक कार्यात यश मिळेल. आयुष्यातील विघ्न दूर होतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. आयुष्यात आनंदी आनंद असेल. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. तुम्ही आनंदाने प्रत्येक कार्यात सहभागी व्हाल. मिथुन मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल ठरेल. या काळात करिअरमध्ये खूप यश मिळेल. व्यवसायात मनासारख्या गोष्टी प्राप्त होतील. गुंतवणून करण्यात यशस्वी व्हाल. या काळात नवी संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पगार, पद वाढेल. विवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. हेही वाचा: २०२५ पर्यंत मिळणार पैसाच पैसा; गुरू ग्रहाची वक्री चाल करणार कमाल ‘या’ तीन राशी होणार मालामाल तूळ सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने तूळ राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल. या काळात चांगली कमाई करण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. प्रेमसंबंधांमध्ये सुखाचे क्षण अनुभवाल, गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कुंभ कुंभ राशीच्या व्यक्तींनादेखील सूर्याचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमचे वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. दूरचे प्रवास घडतील. आरोग्यही उत्तम राहील. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात सर्वांचे मन जिंकाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना फायदा होईल. पैशांची बचत करणे फायदेशीर ठरेल. (टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)