Sun Nakshatra Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.
पंचागानुसार, सूर्य लवकरच मीन राशीत गोचर करणार असून सध्या तो पूर्व भाद्रपद नक्षत्रात उपस्थित आहे. दरम्यान, येत्या १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९ वाजून २७ मिनिटांनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे नक्षत्र गोचर गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी, ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर पडेल.
सूर्याचे नक्षत्र गोचर आयुष्य बदलणार
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल.
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या उत्तर भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच, यावेळी, तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे नक्षत्र गोचर अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात भरपूर यश मिळेल. बँक बॅलन्सही वाढेल. भौतिक सुखात प्रचंड वाढ होईल. कामाचा ताण हलका होईल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली असेल. करिअरमध्ये भरपूर यश प्राप्त कराल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळवाल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरेल.
कुंभ (Kumbha Rashi)
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
