Surya Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

दरम्यान, गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे नवीन उद्योग, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त असल्याचंही मानलं जाते. वैदिक पंचांगानुसार हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा या वर्षी १९ मार्चपासून सुरू होत आहे. गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन होईल.

पंचांगानुसार, सूर्य १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९ वाजून २७ मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रातून उत्तरा भाद्रपद नक्षत्रात गोचर करेल. सूर्याचे हे नक्षत्र गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरेल.

सूर्याचे नक्षत्र गोचर आयुष्य बदलणार

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे नक्षत्र गोचर खूप खास असणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. मनातील भिती, चिंता दूर होईल, समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशींच्या व्यक्तींसाठीही सूर्याचे नक्षत्र गोचर खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. मानसिक स्थिती उत्तम राहील, आरोग्यही सुदृढ असेल.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशींच्या व्यक्तींसाठीही सूर्याचे गोचर खूप उत्तम सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीदेखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील; ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनदेखील सुखमय असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)