Surya Nakshatra Parivartan 2026:  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २० जुलै रोजी सूर्यदेव २७ नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्प नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन अनेक राशींसाठी शुभ ठरु शकते. सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व, सरकारी काम आणि करिअर यांचा कारक ग्रह आहे, तर पुष्प नक्षत्र हे समृद्धी, प्रगती आणि शुभ कार्यांचे प्रतीक मानले जाते. यामुळे या काळात काही राशींच्या लोकांना करिअरमध्ये यश, व्यवसायात नफा, आर्थिक भरभराट होण्याची शक्यता आहे. या काळात कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घ्या.

सिंह

सूर्याचा पुष्य नक्षत्रातील प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठी अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. बऱ्याच काळापासून रखडलेला पैसा परत मिळू शकतो आणि तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कमही वाढू शकते. नोकरदार व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यातील पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. व्यावसायिकांना चांगला नफा, नवीन ग्राहक आणि नवीन प्रकल्पांचा फायदा होऊ शकतो.

मकर

सूर्याचा नक्षत्र बदल मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकतो. या काळात त्यांना प्रत्येक कामात यश मिळू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील आणि तुम्ही ज्या प्रकल्पांवर बऱ्याच काळापासून काम करत आहात ते यशस्वी होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना एखादा मोठा सौदा किंवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मोठा आर्थिक लाभ होईल. नोकरदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि कामाच्या ठिकाणी त्यांची प्रतिमा अधिक मजबूत होईल. कुटुंबात प्रेम, सहकार्य आणि परस्पर विश्वास वाढेल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल असू शकतो.

मीन

मीन राशीसाठी सूर्याचा पुष्य नक्षत्रातील प्रवेश आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. व्यावसायिकांना एखादा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो, ज्यामुळे नफ्यात लक्षणीय वाढ होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असू शकते. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला संपत्ती जमा करण्यातही यश मिळू शकते. कुटुंबात शांतता आणि आनंद नांदेल आणि तुमचा जोडीदार प्रत्येक पावलावर तुम्हाला साथ देईल. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनाही त्यांच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळू शकते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)