Surya Ashlesha Nakshatra Gochar 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेवांचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. १७ ऑगस्टपर्यंत सूर्यदेव बुध ग्रहाच्या अश्लेषा नक्षत्रात विराजमान होतील, ज्याने अनेक राशींचे भाग्य उजळवणार आहेत. या कालावधीत कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होऊ शकतो. सविस्तर जाणून घेऊया.
सूर्यदेव ३ ऑगस्ट २०२६ रोजी अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करीत आहेत, ज्याचा स्वामी बुध ग्रह आहे. सूर्यदेव १७ ऑगस्टपर्यंत याच नक्षत्रात राहतील आणि त्यानंतर मघा नक्षत्रात प्रवेश करतील. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा, मान-सन्मान आणि यशाचा कारक मानले जाते; तर बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र आणि व्यापाराचा कारक आहे. जेव्हा सूर्य ग्रह बुधाच्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम लोकांची आर्थिक स्थिती, संभाषण शैली आणि कार्यक्षमतेवर होतो. या नक्षत्र बदलामुळे तीन राशींच्या लोकांना प्रचंड आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये मोठी प्रगती मिळण्याची शक्यता आहे.
१. वृषभ (Taurus)
सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील, ज्यामुळे आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा दिसून येईल. नोकरदार वर्गाला पदोन्नतीसह इन्सेंटिव्ह किंवा बोनसचा लाभ मिळू शकतो. तसेच दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याचे प्रबळ योग आहेत.
२. कन्या (Virgo)
बुध ग्रह कन्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे सूर्याचे बुधाच्या नक्षत्रात जाणे या राशीसाठी मोठ्या लाभापेक्षा कमी नाही. जर तुम्ही व्यवसायाशी जोडलेले असाल, तर एखादी मोठी आणि फायदेशीर डील फायनल होऊ शकते. मालमत्तेत (प्रॉपर्टी) पूर्वी केलेली गुंतवणूक आता चांगला परतावा देईल. कार्यक्षेत्रात आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
३. धनू (Sagittarius)
हा काळ धनू राशीच्या लोकांसाठी भाग्याची पूर्ण साथ घेऊन येत आहे. अचानक धनलाभाचे योग बनतील, ज्यामुळे तुमची बँक शिल्लक (बँक बॅलन्स) वाढेल. आपल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असून, त्यात यश निश्चित मिळेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभल्यामुळे तुमची कामे सहज पूर्ण होतील.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
