ग्रहांचा राजा सूर्य १६ जुलैपर्यंत मिथुन राशीत राहणार, या ३ राशींच्या व्यक्तींना धनलाभाची शक्यता

ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य ग्रहाचा संबंध पिता, प्रशासकीय पद, समाजातील प्रतिष्ठा आणि सन्मान यांच्याशी आहे. त्यामुळे सूर्य ग्रहाच्या राशीतील बदलाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ही ३ राशी…

ग्रहांचा राजा सूर्य १६ जुलैपर्यंत मिथुन राशीत राहणार, या ३ राशींच्या व्यक्तींना धनलाभाची शक्यता

Surya Transit June 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीत आपली राशी बदलतो. तसेच या राशी बदलाचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक तर कोणाच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. मान-प्रतिष्ठा देणारा सूर्य ग्रह १५ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य ग्रहाचा संबंध पिता, प्रशासकीय पद, समाजातील प्रतिष्ठा आणि सन्मान यांच्याशी आहे. त्यामुळे सूर्य ग्रहाच्या राशीतील बदलाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ही ३ राशी… 

वृषभ : तुमच्या राशीतून सूर्याचे द्वितीय भावात भ्रमण झाले आहे. ज्याला ज्योतिषशास्त्रात धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला ते यावेळी मिळू शकतात. म्हणजे दिलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते आणि कामाच्या ठिकाणी स्थान बदलण्याची शक्यता देखील आहे. दुसरीकडे जर तुमचा व्यवसाय सूर्य आणि शुक्र ग्रहांशी संबंधित असेल तर या काळात तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. यासोबतच व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात आणि कोणत्याही मोठ्या व्यवहारात नफा मिळू शकतो. तसंच आपण नीलमणी रत्न घालू शकता, जे आपल्यासाठी भाग्यवान सिद्ध होऊ शकते.

आणखी वाचा : राहू आणि मंगळाच्या युतीमुळे बनतोय अंगारक योग, या ३ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या

सिंह: सूर्य देव तुमच्या गोचर कुंडलीतून ११ व्या भावात प्रवेश करत आहे, ज्याला उत्पन्न आणि लाभाचे घर म्हटले जाते. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची चिन्हे आहेत. यासोबतच उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. त्याचबरोबर जे लोक प्रॉपर्टी डीलिंग आणि रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर राहील. यासोबतच यावेळी नवीन व्यावसायिक संबंधही तयार होतील, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तसेच सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य देव आहे, त्यामुळे सूर्य ग्रहाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्ही रुबी घालू शकता, जे तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकते.

आणखी वाचा : ३० जूनपर्यंत ग्रहांच्या हालचालीत मोठा बदल, या ४ राशींचे नशीब चमकू शकते

कन्या : ग्रहांचा राजा सूर्य देवाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीवरून सूर्य देवाचे दशम भावात भ्रमण झाले आहे. ज्याला कार्यक्षेत्र आणि नोकरीची जाण असे म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. तुमची कार्यशैली देखील सुधारेल, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते. या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल.

ज्योतिष शास्त्रानुसार कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देव आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्यदेवाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी सुवर्ण यश देणारे ठरू शकते. तुम्ही लोक पन्ना घालू शकता. जे तुमच्यासाठी लकी ठरू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Surya rashi parivartan 2022 sun transit on 15 june in gemini sign the luck of the people of these 3 zodiac may more shine prp

Next Story
राहू आणि मंगळाच्या युतीमुळे बनतोय अंगारक योग, या ३ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या
फोटो गॅलरी