Surya Rashi Parivartan 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा म्हणून ओळखले जाते, त्यामुळे त्याला ग्रहांमध्ये विशेष स्थान आहे. सूर्य हा ओळख, ऊर्जा आणि नेतृत्त्वाचा ग्रह मानला जातो, जो ११ मे २०२६ रोजी कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल. हा नक्षत्र बदल विशेष मानला जातो; ज्यामुळे काही विशिष्ट राशींना याचा मोठा फायदा होऊ शकतो. या राशींच्या जीवनात शुभ काळ सुरू होऊ शकतो, त्यांना धनप्राप्ती होऊ शकते. पण कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घेऊ…
सूर्य ११ मे ते २५ मेपर्यंत या नक्षत्रात राहील, या काळात १२ पैकी ५ राशींना करिअरमध्ये प्रगती साधता येईल.
मेष
मेष राशीसाठी हा काळ खूप फलदायी असेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामात वेग येईल, प्रलंबित कामं पुढे नेण्यासाठी तुम्हाला संधी मिळतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमचे नेतृत्त्वगुण दिसून येतील आणि लोक तुमच्या कामाची दखल घेतील. नवीन काहीतरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे.
मिथुन
मिथुन राशीसाठी हा काळ उत्पन्न आणि ओळख वाढवण्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला नवीन ओळखी पुढे उपयोगी ठरू शकतात. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल, तुमचे नेटवर्क मजबूत होईल आणि भविष्यात त्याचा फायदा होईल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी हा शुभ काळ आहे, मेहनतीला फळ मिळू शकेल. कामात मन स्थिर राहील, करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे. शिक्षण, प्रवास आणि नवीन व्यवसाय करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुमची समाजात प्रतिमा अधिक मजबूत होईल लोक तुमच्यावर आणि तुमच्या कामावर विश्वास ठेवतील.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुमचे कामात मनं गुंतेल आणि कामाचे कौतुकही होईल, विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल, त्याचे परिणाम चांगले दिसतील. करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होतील आणि नातेसंबंध सुधारू शकतात.
