Mangal Shani Yuti In Meen Rashi : एप्रिल २०२६ मध्ये मीन राशीत एक अत्यंत प्रभावी ग्रहयोग तयार होत आहे, जिथे सेनापती मंगळ आणि न्यायाधीश शनी, सूर्य हे ग्रह एकत्र आले आहेत. ज्योतिषशास्त्रात असे योग दुर्मीळ असतात आणि म्हणूनच ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. असे मानले जाते की, सूर्य आत्मविश्वासाचे, मंगळ ऊर्जेचे व शनी कृतीचे प्रतीक आहे. जेव्हा हे तीन शक्तिशाली ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील परिस्थिती अचानक बदलू शकते. काहींना नवीन दिशा आणि संधी मिळू शकतात; तर इतरांसाठी हा काळ आव्हाने, मानसिक दबाव आणि निर्णय घेण्यामध्ये गोंधळ घेणारा ठरू शकतो….
कन्या (Sagittarius)
तुमच्या नातेसंबंधात तणाव वाढलेला जाणवू शकतो. नवीन लोकांशी संबंध जोडताना सावधगिरी बाळगा, घाईने घेतलेले निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतात. या काळात निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यासाठी महागात पडू शकतो. म्हणून संतुलित दिनचर्या ठेवावी. पैसे उधार घेणे, गाडी चालवणे टाळा. नाही तर समस्या वाढतील आणि आदर, प्रतिष्ठा कमी होईल.
धनु (Virgo)
तुमच्यासाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. कारण- आर्थिक दबाव वाढेल, या काळात पैसे उधार घेणे अन् देणे टाळा. कारण- त्याची परतफेड करणे कठीण होऊ शकते. अनावश्यक प्रवास आणि खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. तुम्हाला कुटुंबासोबत काही मतभेदांनाही सामोरे जावे लागू शकते. म्हणून संयम बाळगा. तुमच्या बोलण्यामुळे इतर समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते.
मीन (Pisces)
हा त्रिग्रही योग तुमच्याच राशीत तयार होत आहे, तुमच्यावर सर्वाधिक परिणाम होईल. या काळात तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते आणि त्याचे परिणाम मिळण्यास विलंब होऊ शकतो. भूतकाळातील समस्यांमुळे तुम्हाला मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो. जरी या काळात काही नवीन संधीही उपलब्ध होणार असल्या तरी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या कलेबद्दलही किंचित चिंता वाटू लागेल.
