Surya Shani Navpancham Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती आणि त्यांच्यामध्ये तयार होणाऱ्या कोनांना विशेष महत्त्व असते. दृक पंचागानुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सूर्य आणि शनी १२० अंशाच्या कोनात असतील. ग्रहांचा हा विशेष त्रि-एकादश किंवा नवपंचम योग ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत फलदायी आणि भाग्यवान मानला जातो.

पिता-पुत्राचे नाते असूनही सूर्य आणि शनी हे ग्रह साधारणपणे एकमेकांचे शत्रू मानले जातात. असं असताना जेव्हा हे दोन ग्रह १२० अंश नवपंचम कोनात एकत्र येतात, तेव्हा त्यांचा नकारात्मक प्रभाव नाहीसा होतो आणि ही युती प्रचंड यश, प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळवून देते. तर मग जाणून घेऊया ७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या नवपंचम युतीमुळे कोणत्या चार राशींचे भाग्य उजळून निघणार आहे…

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग तुमच्या करिअर आणि सामाजिक जीवनात नवीन आयाम जोडेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा इच्छित ठिकाणी बदली मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले कोणतेही सरकारी काम किंवा कागदपत्रे आता लवकर पूर्ण होतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमची निर्णयक्षमता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

सिंह राशी

राशीवर स्वत: सूर्याचे अधिपत्य आहे. सूर्य आणि शनीची ही नवपंचम युती तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान ठरेल. व्यावसायिकांना एक महत्त्वपूर्ण करार मिळू शकतो. त्यामुळे भविष्यात भरीव आर्थिक लाभ होईल. न्यायालयाचे निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतात किंवा तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. प्रलंबित निधी वसूल झाल्याने तुमच्या बँक खात्यातील शिल्लक वाढेल.

तूळ राशी

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग उत्पन्न आणि भाग्याचे नवीन मार्ग खुले करेल. तुम्ही उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण करू शकता, त्यामुळे अडचणी कायमच्या दूर होतील. जर तुम्ही शेअर बाजार, जमीन किंवा मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा अत्यंत शुभ काळ आहे. घरातील मतभेद संपुष्टात येतील आणि कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सलोख्याचे होतील.

धनु राशी

धनु राशीसाठी सूर्य आणि शनी यांच्यातील ही नवपंचम युती तुमची बुद्धिमत्ता आणि पराक्रम वाढवेल. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत किंवा करिअर बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना एका प्रतिष्ठित कंपनीकडून मोठ्या पॅकेजची ऑफर मिळू शकते. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. काम किंवा शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात.