Surya Shani Pratiyuti 4 October 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानले जाते. शनी हा नवग्रहांमधील सर्वात संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह असून, एका राशीत तो साधारण अडीच वर्षे राहतो. सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. या काळात त्याची इतर ग्रहांसोबत विविध स्थितींमध्ये युती आणि योग तयार होत आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार, ४ ऑक्टोबरला सूर्य आणि शनी एकमेकांच्या समोर येणार आहेत. सूर्य आणि शनी यांच्यातील या स्थितीला ज्योतिषशास्त्रात ‘प्रतीयुती’ म्हटले जाते. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी ही स्थिती तयार होणार आहे. या ग्रहस्थितीचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तर मग जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत…

सिंह राशी- आर्थिक स्थैर्याची शक्यता?

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ काही बाबतीत दिलासा देणारा ठरू शकतो. शनी वक्री अवस्थेत आठव्या भावात, तर सूर्य दुसऱ्या भावात असल्यामुळे मागील काही काळापासून जाणवत असलेल्या अडचणी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी आणि मान-सन्मान मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही लाभाचे संकेत दिसत आहेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता असून आर्थिक स्थितीतही स्थिरता येऊ शकते. मात्र, स्वतःवर खर्च वाढल्यास बचतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

कन्या राशी- नातेसंबंधातील अडचणी कमी होणार?

कन्या राशीसाठीही सूर्य-शनीची प्रतीयुती सकारात्मक ठरू शकते. शनी सातव्या भावावर प्रभाव टाकत असून सूर्य पहिल्या भावात आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वैयक्तिक किंवा नातेसंबंधातील समस्या हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊ शकतात. या काळात स्वतःच्या गरजा आणि प्राधान्यांकडे अधिक लक्ष देण्याची प्रवृत्ती वाढू शकते.

धनु राशी- अडचणींमधून दिलासा

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळही महत्त्वाचा ठरू शकतो. मागील काही काळापासून सुरू असलेली नकारात्मकता किंवा अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदलीची संधी मिळू शकते. कुटुंबातील दीर्घकाळ सुरू असलेले वाद आणि मतभेद कमी होण्याची शक्यता आहे. जवळच्या नातेवाईकांसोबतचे गैरसमज दूर होऊन संबंध सुधारू शकतात. या काळात सुख-समृद्धीत वाढ होण्याची शक्यता असून काही विद्यमान आरोग्यविषयक त्रासांमध्येही दिलासा मिळू शकतो.