Navpancham Rajyog 2026 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रहांची हालचाल आणि त्यांच्यामध्ये तयार होणारे कोन अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. पंचांगानुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सूर्य व शनी एकमेकांशी अंदाजे १२० अंशांच्या कोनात असतील. या स्थितीमुळे त्रि-एकादश किंवा नवपंचम योग तयार होईल, जो ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शुभ व भाग्यशाली मानला जातो. सामान्यतः, सूर्य व शनी एकमेकांच्या विरोधात मानले जातात. पण, जेव्हा हे दोन ग्रह या विशेष कोनात येतात. तेव्हा त्यांचे नकारात्मक परिणाम कमी होतात आणि हा योग यश, आदर, आर्थिक समृद्धी घेऊन येतो. चला पाहूया की, या योगामुळे कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मेष

या योगाचा प्रभाव तुमच्या करिअर व सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा इच्छित ठिकाणी बदली मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात. समाजात तुमचा आदर वाढेल आणि तुमची निर्णयक्षमता अधिक मजबूत होईल.

सिंह

तुमच्या राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे शनीबरोबरचा हा विशेष योग शुभ परिणाम देऊ शकतो. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण संधी मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात नफा होईल. कायदेशीर बाबींमध्ये दिलासा मिळू शकतो, वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेल्या निधीच्या परताव्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

तूळ

हा योग उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले करू शकतो. अनेक स्त्रोतांकडून निधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे सुरू असलेले कौटुंबिक मतभेद संपुष्टात येतील आणि नातेसंबंध अधिक सलोख्याचे होतील.

धनु

तुमच्यासाठी हा योग आत्मविश्वास व कार्यक्षमता वाढवू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. परदेश प्रवासाचे प्रयत्नही यशस्वी होऊ शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)