Surya Shukra and Chandra Gochar Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होत असते, शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काहींच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मार्च महिन्यामध्ये एकाच दिवशी ग्रहांचे गोचर होणार आहे. ज्यात ग्रहांचा राजा सूर्य १५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ०८ मिनिटांनी मीन राशीत गोचर करेल. याच दिवशी सकाळी १० वाजून ४३ मिनिटांनी शुक्र रेवती नक्षत्रात राशीत प्रवेश करेल. त्यानंतर याच दिवशी चंद्र पहाटे ०४ वाजून ४८ मिनिटांनी श्रवण नक्षत्रात गोचर करेल. एकाच दिवशी तीन ग्रहांचे परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी महाधनलाभ घडवणार आहे.
ग्रहांचे महागोचर ‘या’ राशींचे नशीब चमकवणार
कर्क (Kark Rashi)
सूर्य, शुक्र आणि चंद्राचे गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी खूपच अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीसाठी सूर्य, शुक्र आणि चंद्राचे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
धनु (Dhanu Rashi)
सूर्य, शुक्र आणि चंद्राचे गोचर धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. कुटुंबात शुभकार्ये होतील. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील.आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
मीन (Meen Rashi)
सूर्य, शुक्र आणि चंद्राचे गोचर मीन राशीसाठी खूप लाभदायी असेल. हे परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
