Shukraditya Rajyog 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते आणि तो सन्मान, आत्मा, ऊर्जा, सरकारी नोकरी आणि इतर अनेक गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो. सूर्य एका राशीत अंदाजे ३० दिवस राहतो. परिणामी, त्याच्या स्थितीतील बदलांचे परिणाम जागतिक स्तरावर, तसेच १२ राशींच्या लोकांना जाणवू शकतात. सध्या सूर्य मीन राशीत शनी, मंगळाबरोबर आहे; पण, तो १४ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे.
सूर्य जेव्हा त्याची ऊर्जा जास्त असणाऱ्या मेष राशीत प्रवेश करतो, तेव्हा तो शुक्राबरोबर युती करतो, ज्यामुळे शुक्रादित्य राजयोग तयार होतो. शुक्र आणि सूर्याची ही युती अंदाजे दर १२ महिन्यांनी होते. या काळात सूर्य सर्वोत्तम स्थितीत असतो, ज्यामुळे सर्व १२ राशींच्या लोकांवर चांगला परिणाम होतो. पण, त्याचे परिणाम प्रत्येक वेळी सारखेच असतील, असे नाही. हे तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवरूनही ठरते.
पंचांगानुसार, सूर्य मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करून १५ मे पर्यंत या राशीत राहील. या काळात, सूर्य शुक्राबरोबर युती करणार आहे, जी २६ एप्रिलपर्यंत टिकणार. यानंतर, शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मग, ३० एप्रिल रोजी बुधादित्य राजयोग निर्माण करणार आहे.
सूर्य-शुक्र युतीचा १२ राशींना कसा होईल फायदा
मेष
सूर्याचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या कुंडलीच्या लग्न स्थानात शुक्र आणि सूर्याची युती होते आहे. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होऊ शकते, आदर वाढू शकतो, कामात प्रगती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी काळ अधिक चांगला राहील, ज्यामुळे कामाचे कौतुक केले जाईल.
वृषभ
सूर्य तुमच्या राशीच्या कुंडलीच्या बाराव्या स्थानात गोचर होणार असल्यामुळे तुमच्या नशिबात परदेश प्रवास, नवी ओळख आणि यश पदरात पडताना दिसेल. तुम्ही तुमच्या शत्रूंवरही विजय मिळवू शकता. न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते.
मिथुन
तुमच्या कुंडलीच्या अकराव्या स्थानात सूर्य गोचर होत आहे. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल, आर्थिक परिस्थिती सुधारेल, भविष्यासाठी बचत करण्याची क्षमता वाढेल, मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे मानसिक ताण कमी होऊ शकतो. हा काळ विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो, ज्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करून तुम्ही यश मिळवू शकता.
कर्क
सूर्याचे गोचर तुमच्या कुंडलीच्या दहाव्या घरात म्हणजेच कर्म भावात होणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती, पदोन्नतीचे संकेत, कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा आणि तुमची ध्येये साध्य करण्यास मदत होणार आहे.
सिंह
तुमच्या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे, जो नवव्या घरात भ्रमण करणार आहे. शुक्राबरोबर युती झाल्यामुळे सूर्य या राशीच्या व्यक्तींना अनेक क्षेत्रांमध्ये लाभ मिळवून देऊ शकतो. या राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळू शकते. उच्च शिक्षण घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुमचा कल अध्यात्माकडे राहील, ज्यामुळे तुम्ही अनेक धार्मिक तीर्थयात्रा करू शकता.
कन्या
या राशीच्या बाराव्या घराचा स्वामी असलेला सूर्य, आठव्या घरात प्रवेश करत आहे, जे सहसा शुभ परिणाम देत नाही. पण, शुक्र तुम्हाला लाभ मिळवून देऊ शकतो. फक्त कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा आणि आरोग्याबाबत सावध रहा.
तूळ
या राशीच्या कुंडलीतील अकराव्या घराचा स्वामी असलेला सूर्य सातव्या घरातून भ्रमण करणार आहे. परिणामी, तुम्हाला वैवाहिक जीवनात आणि भागीदारी व्यवसायात लाभ मिळू शकतो. पण, वैवाहिक जीवनात काही अडचणी, जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात. त्यामुळे विचार संयमाने व्यक्त करा.
वृश्चिक
सूर्याचे मेष राशीतील भ्रमण तुमच्यासाठी प्रचंड लाभ घेऊन येऊ शकते. सूर्य या राशीच्या सहाव्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे शत्रूंवर विजय, सरकारी कामातील अडथळ्यांवर मात करता येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरचे तुमचे संबंध सुधारू शकतात.
धनू
सूर्य या राशीच्या कुंडलीतील पाचव्या घरात प्रवेश करणार आहे. परिणामी, या राशीच्या व्यक्तींना अनेक क्षेत्रांमध्ये फायदा होऊ शकतो. नशीब त्यांच्या बाजूने असेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या व्यावसायिक रणनीती प्रभावी ठरू शकतात.
मकर
तुमच्यासाठी सूर्याचे गोचर फायदेशीर ठरू शकते. तुमच्या कुंडलीत सूर्य चतुर्थ भावात आणि तोही त्याच्या उच्च राशीत मेषमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक चांगले बदल होऊ शकतात.
कुंभ
सूर्य तुमच्या राशीच्या तिसऱ्या घरात गोचर करणार आहे, जिथे तो शुक्र आणि बुध यांच्याबरोबर युती करणार आहे. या घरात सूर्य असल्यामुळे या राशीच्या व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत करतील. तुमचा सामाजिक आदर वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही फायदा होऊ शकतो. तुमचे धैर्यही वाढू शकते. त्याव्यतिरिक्त कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते.
मीन
सूर्य तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीतील दुसऱ्या घरात म्हणजेच धन स्थानात भ्रमण करत आहे. त्यामुळे अडकलेला निधी परत मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना प्रचंड यश मिळू शकते. पण, आपल्या बोलण्यात संयम ठेवा. विकसित होत असलेले प्रकल्प किंवा नातेसंबंधांमध्ये अडथळा येऊ शकतो.
