Rashi Bhavishya 14 April 2026 In Marathi : आज १४ एप्रिल २०२६ रोजी चैत्र कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी रात्री १२ वाजून १३ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत शुक्ल योग जुळून येईल आणि संध्याकाळी ४ वाजून ६ मिनिटांपर्यंत शतभिषा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १४ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ७ वाजून ३३ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून ०७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असणार जाणून घेऊ…
आजचे पंचांग व राशिभविष्य, १४ एप्रिल २०२६ (Dainik Rashi Bhavishya 14 April 2026 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. सरकारी कामे मार्गी लागतील. कामातील बदल जाणून घ्यावेत. मौल्यवान वस्तु जपून ठेवाव्यात. आवडीचे पदार्थ चाखाल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. साहित्याची आवड जोपासता येईल. भावंडांना बाहेर गावी जाण्याचं योग येईल. मैत्रीतील आपुलकी वाढेल. फार दूरचे विचार करू नका.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
क्षणिक सौख्याचा आनंद घ्याल. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने मार्गक्रमण कराल. व्यापारात चांगला लाभ होईल. कमिशनचा लाभ उठवावा.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
स्त्री वर्गाचा सहवास लाभेल. नवीन मित्रा जोडले जातील. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल. महिलावर्ग मनाजोगी खरेदी करेल. चांगले साहित्य वाचनात येईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
चारचौघांत तुमची कला सादर करता येईल. योग्य विचारांची जोड घ्यावी. धार्मिक साहित्य वाचाल. इतरांना मना पासून मदत कराल. मनात नवीन कल्पना रुजतील.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
अचानक धनलाभ संभवतो. लॉटरीचे तिकीट घ्याल. घरगुती प्रश्न समजून घ्यावेत. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामे पूर्ण होतील.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
पत्नीचे प्रेमळ सौख्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. कामातून आत्मिक समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धीचा मार्ग आखावा. मुलांचा खोडकरपणा वाढेल.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. बोलण्याचा भरात नवीन जबाबदारी अंगावर घ्याल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
पित्ताचा विकार जाणवेल. कामाचा फार ताण घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. स्वत: मध्ये काही बदल करून पहावेत. कामातील अडथळे प्रयत्नपूर्वक दूर करावेत.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
सामाजिक बांधीलकी जपावी. वादावादीत सहभाग घेऊ नका. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. धाडसाने कामे पूर्ण कराल. तुमची हिम्मत वाढीस लागेल.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
मित्रांचा रोष वाढवून घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक चंचलता जाणवेल.
