वैदिक ज्योतिषात सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो, म्हणून ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तथापि, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सूर्य हा एक ग्रह मानला जात नाही. दुसरीकडे, जर आपण ज्योतिषशास्त्राबद्दल बोललो, तर सूर्य ग्रह मानवी शरीरावर सर्वात जास्त परिणाम करतो. संक्रमण म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत ग्रहाचे गोचर करणे. जेव्हा सूर्य कोणत्याही राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या राशीच्या नावाने संक्रांती देखील मानली जाते. अशा स्थितीत जेव्हा सूर्य एप्रिल महिन्यात मेष राशीत गेल्याने मेष संक्रांती म्हणतात. सनातन धर्मातही सूर्याला रवि किंवा सूर्य देव अशी उपाधी देण्यात आली आहे. सूर्याने १४ एप्रिल २०२२ रोजी ८ वाजून ३३ मिनिटांनी उच्च राशी असलेल्या मेष राशीत प्रवेश केला आहे. उच्च राशीत सूर्याचे भ्रमण काहींवर शुभ तर काहींवर अशुभ प्रभाव टाकू शकते. जाणून घेऊयात

वृषभ: वृषभ राशीत सूर्य मोक्ष, व्यय आणि नुकसानीचं स्थान असलेल्या बाराव्या भावात विराजमान असेल. या काळात परदेशात काम करत असलेल्या लोकांना चांगला लाभ मिळेल. हे संक्रमण तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप मोठे यश देईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची शक्यता आहे, आरोग्यही चांगले राहील. प्रवासाचे योग आहेत तसेच आध्यात्मिक दृष्ट्या तुमचे मन जोडले जाईल.

मिथुन: मिथुन राशीसाठी सूर्य उत्पन्न, लाभ आणि इच्छा असलेल्या अकराव्या स्थानात विराजमान आहे. या संक्रमणादरम्यान चांगले पैसे कमविण्यात यशस्वी होऊ शकतात. आर्थिक स्थिती खूप मजबूत होण्याची शक्यता आहे. शत्रूंपासून सावध राहा तसेच प्रतिस्पर्धी आणि विरोधकांकडून लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. आरोग्याबाबत जागरुक राहा, जुन्या गोष्टींमुळे कुटुंबात तेढ निर्माण होऊ शकतो. प्रभावशाली लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा.

Trigrahi Yog: मेष राशीत त्रिग्रही योग, तीन राशींसाठी शुभ काळ

कर्क: या राशीसाठी सूर्य देव करिअर, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीच्या दहाव्या भावात विराजमान आहे. संक्रमणाच्या या काळात करिअरच्या दृष्टीने खूप आनंद मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करत असलेल्या लोकांच्या जीवनात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोकांसाठी आणि सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांसाठी, संक्रमण खूप चांगले परिणाम देईल. वाणीवर संयम ठेवा, वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा.