Kendra Rajyog 2026: २६ जून २०२६ रोजी अंतराळात एक मोठा आणि दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे. द्रिक पचांगनुसार, सकाळी ४ वाजून ६ मिनिटांना आत्माचा कारत सूर्य देव आणि रसहस्यमी ग्रह वरुण एकमेकांपासून ९० अंशाच्या अंतरावर येतार केंद्र योग निर्माण होईल. ज्योतिष्यशास्त्रानुसार, सूर्य आणि वरुण दरम्यान तयार होणाऱ्या या केंद्र योगाला अत्यंत संवेदनशील आणि अनेक दृष्टिकोनातून नकारात्मक मानले जाते. वरुण ग्रह भास, धोका, अज्ञात भय आणि मानसिक उलथापालथ घडण्याचे कारण मानले जाते तर सूर्य आत्म आणि आत्मविश्वासाचे प्रतिक मानले जाते.
जेव्हा दोन ग्रह एकमेकांसमोर ९० अंशावर येतात तेव्हा व्यक्तीची निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. या वेळी केंद्र योगाचा अशुभ प्रभाव विशिष्ट ५ राशींवर होण्याची शक्यता असून त्यांचे जीवनात संकट येऊ शकता. चला जाणून घेऊ या कोणत्या आहेत त्या ५ राशी
मेष राशी (Aries)
सूर्य आणि वरुणाचा हा योग मानसिक ताण आणि गैरसमज होण्याची स्थिती निर्माण करेल. ज्यामुळे या राशीच्या लोकांच्या करिअरवर विपरित परिणाम होईल. कर्मचाऱ्यांबरोबर ताळमेळ होणार नाही. तुमचे पूर्ण होत आलेले काम शेवटच्या क्षण अपूर्ण राहील ज्यामुळे तुमची चिडचिड होईल. या काळात कोणताही नवा प्रकल्प किंवा व्यवसायाची योजनेवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. पैशांचे व्यवहारात धोका होण्याची शक्यता आहे.
मिथुन राशी (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आरोग्य आणि आर्थिक स्थितीमध्ये अनेक चढउतार पाहावे लागतील. वरुणचा भास निर्माण करण्याचा प्रभावामुळे चुकीच्या गुणंतवणूक करू शकता. व्हायफळ खर्च अचानक वाढेल आणि ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन बिघडेल. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नका. विशेषतः पोट आणि डोळ्यांच्या समस्यांबाबत त्रास होण्याची शक्यता आहे. कायदेशीर गोष्टींपासून दूर राहा.
सिंह राशी (Leo)
सूर्य सिंह राशीचा स्वामी असल्याने या राशींच्या लोकांवर केंद्र योगाचा थेट आणि गंभीर परिणाम होईल. ऑफिसमध्ये मान-सन्मानाला धक्का पोहचू शकतो. वरिष्ठांबरोबर मतभेद अथवा वाद होऊ शकतात. तुमच्यामध्ये अहंकार वाढू देऊ नका. भागीदारीमधये व्यवसाय करत असाल तर भागिदाराच्या हालचालींवर लक्ष ठेवा, पारदर्शी व्यवहार असणे आवश्यक आहे.
तूळ राशी (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी हे गोचर कौंटुबिक आणि मानसिक शांतीवर परिणाम करणारे असू शकते. कुटंबातील सदस्यांमध्ये जुन्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो पण आत्मविश्वासाची भावना निर्माण होऊ शकते. तुम्हाला स्वत:ला तणावग्रस्त असल्यासारखे वाटू शकते. या काळात घर आणि कुटुंबाच्या प्रकरणांमध्ये काम केले आहे. कोणताही विचार न करता दिली गेलेली प्रतिक्रिया तुमच्या नातेसंबध खराब करू शकते.
मीन राशी (Pisces)
मीन राशीच्या लोकांना या काळात आपल्या करिअर आणि वैयक्तिक जीवन दोन्हीमध्ये सांभाळून चालण्याची आवश्यकता आहे. तुमच्या मनात अज्ञात भिती आणि नकारात्मक विचार येऊ शकतात ज्यामुळे तुमची कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार सोडून देणे चांगले आहे. भावनिक होऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे तुमच्या बुद्धीचा वापर करा.
सूर्यदेवाची उपासना करा. दररोज सकाळी, तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे कुंकू घालावे आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून ‘ओम घृणी सूर्य नमः’ या मंत्राचा जप करावा. वरुणच्या नकारात्मक प्रभावांपासून (भ्रमापासून) मुक्त होण्यासाठी मन शांत ठेवून दररोज किमान १०-१५ मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करावा. गायत्री मंत्राचा जप करा. मानसिक स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी गायत्री मंत्राचा २१ वेळा जप करणे शुभ आणि फलदायी ठरेल.
