बॉसशी नडला अन् हातचा रोजगार घालवून बसला! ३० दिवस ‘या’ ५ राशींवर ओढवणार ‘कुऱ्हाडीवर पाय’ अन् ‘दुष्काळात तेरावा महिना’
सिंह राशीत सूर्य आणि केतुची युती झाल्याने अत्यंत अशुभ मानला जाणारा ‘सूर्य ग्रहण योग’ तयार झाला आहे. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०८:०३ वाजता सूर्य कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करत आहे, जिथे केतु ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत म्हणजेच पुढील ३० दिवस हा योग कायम राहील.

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा आत्मविश्वास, मान-सन्मान, पिता आणि सरकारी कामांचा कारक आहे, तर केतु वैराग्य, रहस्य आणि अचानक होणाऱ्या बदलांचा कारक आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे मानसिक अस्वस्थता, भ्रम आणि करिअरमध्ये आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या कोणत्या ५ राशींना या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल:

१. मिथुन (Gemini)

कामातील निष्काळजीपणा भारी पडू शकतो. नोकरी आणि व्यवसायात अडचणी वाढू शकतात. ऑफिसमध्ये बॉस किंवा वरिष्ठांशी वाद टाळा. व्यापाऱ्यांनी नवीन कराराच्या बाबतीत घाईघाईने निर्णय घेऊ नयेत.

२. कर्क (Cancer)

कौटुंबिक पातळीवर नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठांशी योग्य व्यवहार करा. एखादा जुना वाद उफाळून येऊ शकतो. तुम्ही तुमचे योग्य म्हणणेही चुकीच्या पद्धतीने मांडून अडचणीत येऊ शकता. मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा.

३. सिंह (Leo)

सूर्य-केतुची युती सिंह राशीतच होत असल्याने या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. आत्मविश्वास कमी होणे, अहंकार वाढणे आणि भ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते. स्वतःचे तसेच वडिलांचे आरोग्य बिघडू शकते. करिअरमध्ये मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

४. वृश्चिक (Scorpio)

करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. मिळालेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडा. यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. सहकाऱ्यांशी वाद घालू नका. व्यापारी वर्गाने कागदपत्रांच्या कामात (डॉक्युमेंटेशन) कोणतीही चूक करू नये.

५. कुंभ (Aquarius)

धनहानी होण्याचे संकेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची तुमच्या कामावर बारीक नजर असेल. कागदपत्रे किंवा फाइल्स स्वतः नीट तपासल्याशिवाय पुढे पाठवू नका किंवा सही करू नका. चुका टाळण्याचा प्रयत्न करा आणि वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा.