Swami Samarth Prakat Din Rashi Bhavishya 20 March 2026 : आज २० मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असणार आहे. त्याचबरोबर ब्रम्ह योग जुळून येईल आणि रेवती नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच आज स्वामींचा प्रकट दिन असणार आहे. स्वामी कोणत्या रूपात तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार जाणून घेऊयात….
दैनिक पंचांग व राशिभविष्य, २० मार्च २०२६ (Swami Samarth Prakat Din Dainik Rashi Bhavishya 20 March 2026 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबात तुमचा दबदबा वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधाल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
करमणुकीत जास्त वेळ घालवाल. जोडीदाराचे भरभरून कौतुक कराल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवक जावक यांचा मेळ घालाल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
क्षणिक सुखाने खुश व्हाल. कामाचा वेग वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
आवडीच्या कामांवर भर द्याल. सरकारी कामे मार्गी लागतील. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. कौटुंबिक सौख्याचा प्रथम विचार करावा. मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. अंगीभूत कला सर्वांसमोर सादर कराल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. उगाच काळजी करत बसू नये.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
मुलांचे विचार दुराग्रही वाटू शकतात. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
अचानक धनलाभ संभवतो. कामात गतीमानता लाभेल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. घाई-घाईने कामे उरकू नका. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
अनाठायी खर्च वाढू शकतो. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. महिलांना गृहिणी पदाचा मान मिळेल. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्या.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
श्रम व दगदग वाढू शकते. पित्त विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. जवळचे मित्र भेटतील. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
कामाचे समाधान लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल. सहकार्यांची योग्य वेळी मदत होईल. आत्मविश्वास बाळगावा लागेल. उगाच चीड-चीड करू नये.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
स्वछंदीपणे विचार कराल. कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्याल. मानसिक व्यग्रता जाणवेल. मुलांबरोबर खेळात रमून जाल.
