Taurus Monthly Horoscope for February 2026 : राशीचक्रातील पहिली रास म्हणजे वृषभ. वृषभ ही शुक्राची रास आहे. कलात्मकता, रसिकता आणि नाविन्याची ओढ हे शुक्राचे गुणधर्म वृषभ राशीतही पुरेपूर दिसून येतात. स्वतःचे जीवन कसे समृद्ध होईल याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. निर्मितीक्षमता आणि सर्जनशीलता या राशीच्या मंडळींमध्ये आढळतात. भरपूर काम करणे जसा स्थायी भाव आहे आणि आराम सुद्धा या राशीला मनापासून आवडतो. जे चांगलं आहे, जे उत्तम आहे तेच तुम्हाला हवे असते. असा तुमचा ध्यास असतो.
त्याचबरोबर शुक्राची रसिकता, आकर्षकता आणि सगळ्यात रस असणे हे गुण वृषभ राशीत आढळतात. सुख सोयींचा उपभोग घेणे, समृद्ध जीवन जगणे याकडे तुमचा कल असतो. काम, कष्ट करायला आपण सदैव तत्पर असता. दीर्घोद्योगी, आशावादी आणि व्यवहारकुशल अशा या वृषभ राशीला फेब्रुवारी महिना कसा जाणार जाणून घेऊयात.
मेहनतीनेच पुढे जाता येणार…
जे ठरवणार ते करून दाखवणार या न्यायाने संपूर्ण महिना ध्येयाने पझाडलेले असाल. अनेक विचार, कल्पना, संकल्पना, कलात्मक दृष्टिकोन प्रत्यक्षात साकारण्यासाठी भरपूर मेहनत घ्याल. विद्यार्थी वर्गाने कला, क्रीडा, छंद यासोबतच अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मेहनतीनेच पुढे जाता येणार आहे हे ध्यानात असू द्यावे. नोकरीमध्ये नव्या संधी उपलब्ध होतील.
हितशत्रूंचा खोटेपणा उघडकीस आणाल. विवाहोत्सुक वधूवरांना आपला जोडीदार मिळेल. कुटुंबाच्या जबाबदारीचे भान ठेवाल. गुंतवणूकदारांना महाशिवरात्र विशेष लाभकारक ठरेल. घराच्या कागदपत्रांचा तपशील नीट पडताळून पहावा. पोटरीतील बारीक शिरा, नसा आखडण्याची शक्यता आहे.तर असा वृषभ राशीचा फेब्रुवारी महिना असणार आहे…

