Vyatipat Yog 2026 : वैदिक ज्योतिष्यशास्त्रामध्ये व्यतिपात योग हा कठीण आणि आव्हाणात्मक काळ मानला जातो. हा योग तेव्हा निर्माण होतो जेव्हा सूर्य आणि चंद्र एकमेकांपासून ३६० अंशावर विराजमान आहे. दोन्ही ग्रह एका खास स्थितीमध्ये एकमेकांसमोर येतात. द्रिक पंचागानुसार, २०२६ मध्ये २५ एप्रिलला निर्माण होणारा व्यतिपात योग काही राशींसाठी आव्हाने किंवा संकटे घेऊन येऊ शकतो. अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांना थोडे सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ या.

व्यतिपात योगामुळे या ४ राशीना करावा लागेल आव्हानांचा सामना (Unlucky Zodiac due to Vyatipat Yog)

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याच आहे. घाईत घाईत घेतलेले निर्णयामुळे नुकसान होऊ शकतो त्यामुळे गुंतवणूकी आधी विचार करा. कुटुंबाच्या एखाद्या सदस्याची तब्येत चिंता वाढू शकते, ज्यामुळे मानसिक तनाव वाढू शकतो. कामाचा थोडा ताण वाढेल, यामुळे धैर्याने काम करणे. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.

कन्या राशी (Virgo)

कन्या राशीच्या लोकांना आपल्या वर्तणूक आणि काम दोन्हीवर नियंत्रण ठेवावे लागेल. ऑफिसमध्ये कोणत्याही व्यक्तीबरोबर वाद आणि गैरसमज होऊ शकतो ज्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. काम पूर्ण करण्यासा उशीर होऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीवर जास्त प्रतिक्रिया देणे टाळा आणि शांत राहून परिस्थिती हाताळा. आरोग्याची काळजी घ्या. विशेषत: तणावर दूर करण्याचा प्रयत्न करा.

मकर राशी (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनी या काळात आपल्या आरोग्याकडे दूर्लक्ष करू नये. जुने आजारांचा त्रास पुन्हा होऊ शकतात त्यामुळे या काळात योग्य वेळी उपचार आणि उपाय आवश्यक आहे. कुटुंब आणि नात्यांमध्ये तणाव येऊ शकतो त्यामुळे संवाद साधताना थोडा संयम राखा. खर्चा वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे बजेट खराब होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये वायफळ खर्च करणे टाळा. नियोजन केल्यास फायदा होईल.

मीन राशी (Pisces)

मीन राशीच्या लोकांना या काळात भावानांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही नव्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवण्यामुळे नुकसान होऊ शकते. कामासंबधीत निर्णय विचार करून घ्या कारण घाई घाईत निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मानसिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकते त्यामुळे स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या मोठा निर्णय घेणे टाळा.

टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.