Shravan 2022 Maharashtra: श्रावणाचा पवित्र महिना २९ जुलैपासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात या पवित्र महिन्याला विशेष असं स्थान आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, सावन हा आषाढ महिन्यानंतर येणारा पाचवा महिना आहे आणि तो भगवान शिवाला समर्पित आहे. या महिन्यात भक्त दर सोमवारी उपवास करतात आणि भगवान शंकराला बेल पत्र, गाईचे दूध, धतुरा, भांग आणि चंदन अर्पण करतात. यावर्षीचा पहिला श्रावण सोमवार व्रत २९ जुलै रोजी होणार असून पवित्र महिना २३ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या महिन्यात अनेकजणांचे उपवास असतात. तर या पवित्र महिन्यात उपवासाचे देखील नियम सांगितले आहेत जे आपण पाळले पाहिजे. तर जाणून घेऊया श्रावण महिन्यात उपवासाचे नियम.

पवित्र महिन्यात उपवासाचे कोणते नियम पाळले पाहिजेत?

१) व्रत प्रामाणिकपणे पाळले पाहिजे आणि विधींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
२) महिन्याच्या प्रत्येक सोमवारी लवकर उठणे, स्नान करणे, घर स्वच्छ करणे आणि गंगाजल शिंपडणे आवश्यक आहे.
३) घराच्या ईशान्य दिशेला भगवान शिवाची मूर्ती किंवा चित्र ठेवावे, तसंच त्यांना बाल पत्र, चंदन, धतुरा, भांग आणि कच्चे गाईचे दूध अर्पण करावे. पूजा विधी झाल्यानंतर आरती करावी.
४) उपवास करताना, स्वतःला उपाशी ठेवू नका. दर दोन तासांनी सुके मेवे आणि फळे खात राहा.
५) सावन महिन्याच्या पवित्र महिन्यात, सोमवारी उपवास करताना, उपवासाच्या आहारात नट्स, फळे, दूध आणि लोणी यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तसंच राजगिराचे पीठ समाविष्ट करा.
६) शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पाणी, दूध, ताक आणि ताजे ज्यूस प्या.
७) पवित्र महिन्यात स्वयंपाकाच्या पाककृतींसाठी टेबल मिठाच्या जागी रॉक सॉल्ट किंवा सेंधा नमक घाला. तसेच, मसाले वापरताना जिरे, दालचिनी, हिरवी वेलची, लवंगा वापरण्यापेक्षा काळी मिरी पावडर, तिखट आणि काळी मिरी पूडचा वापर करा.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Gold price bounced in four hours on Gudi Padwa 2024
गुढी पाडव्याच्या दिवशीच चार तासात सोन्याच्या दरात उसळी; ‘हे’ आहे आजचे विक्रमी दर…
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य
Sagittarius April Horoscope
Sagittarius : धनु राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात घ्यावी विशेष काळजी; कशी असेल त्यांची आर्थिक स्थिती अन् लव्ह रिलेशन? जाणून घ्या

( हे ही वाचा: पावसात भिजणे आरोग्यासाठी आहे फायदेशीर; मिळतील आश्चर्यकारक फायदे)

या चूका करू नका

१) भगवान शिवाची पूजा करताना केतकीचे फूल आणि हळद वापरण्यास मनाई आहे.
२) तज्ज्ञांच्या मते, पवित्र महिन्यात कांदा, लसूण आणि मसाल्यांचे सेवन टाळावे. तसेच, मोहरीचे तेल, मसूर डाळ, वांगी आणि तिळाचे तेल यांसारखे इतर पदार्थ आणि तेल टाळावे.
३) याशिवाय, मांस, अंडी, मद्य आणि तंबाखूचे सेवन देखील श्रावण महिन्यात करण्यास सक्त मनाई आहे.
४) आणि जर तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर संध्याकाळी आरती किंवा सूर्यास्तापूर्वी योग्य पूर्ण जेवण किंवा शेवटचे जेवण करू नका.
५) पॅक केलेले रस पिणे टाळा कारण त्यात चव वाढवण्यासाठी मीठ घालू शकतात.