Chanakya Niti For Husband : आचार्य चाणक्य हे एक महान तत्त्वज्ञानी आणि राजकारणी होते. त्यांनी नैतिकतेचे धोरण तयार केले होते; नीतिशास्त्रामध्ये त्यांनी आपले जीवन कसे जगावे हे सांगितले आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीने जीवनात कोणती मूल्ये पाळली पाहिजेत? व्यक्तीचे जीवन सुखी आणि यशस्वी करण्यासाठी नीतिशास्त्रात अनेक उपयुक्त सल्ले देण्यात आले आहेत. यात त्यांनी यशस्वी वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधांवरही सविस्तर विवेचन केले आहे. चाणक्य नीतीनुसार, योग्य जीवनसाथी निवडल्याने तुमचे नशीब बदलू शकते. त्यांनी पुरुषांच्या काही विशेष गुणांवरही प्रकाश टाकला आहे, जे त्यांना श्रेष्ठ आणि विश्वासार्ह बनवतात.
भाग्यवान पुरुषांमधील गुण
चाणक्यांच्या मते, जर एखाद्या पुरुषात हे गुण असतील तर तो केवळ एक चांगला पतीच नाही, तर त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे भाग्य उज्ज्वल होऊ शकते.
१) संयम आणि प्रतिष्ठा – जो पुरुष आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आणि सुखसोयी व चैनीचा त्याग करून विनयशीलतेचे पालन करतो, त्याला अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. असे पुरुष कठीण काळातही संयमी राहतात.
२) स्त्रियांबद्दल आदर – चाणक्यांच्या मते, जो पुरुष आपल्या पत्नीशी एकनिष्ठ असतो आणि इतर स्त्रियांना आई किंवा बहीण मानतो, तो अत्यंत भाग्यवान आणि सद्गुणी असतो. अशा पुरुषाबरोबर स्त्रीला नेहमी सुरक्षित वाटते.
३) सुरक्षितता आणि जबाबदारी – खरा पुरुष तोच असतो जो आपल्या पत्नीला मानसिक आणि शारीरिक सुरक्षितता देतो. तो कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून पळून जाण्याऐवजी त्या स्वीकारतो.
४) अहंकाराचा त्याग – जो माणूस ज्ञान आणि यश मिळवूनही अहंकारी होत नाही आणि आपल्या जोडीदाराचा आदर करतो, तोच खऱ्या अर्थाने महान असतो.
चाणक्यांच्या माणसांना पारखण्याच्या पद्धती
त्याग – कठीण काळात तो तुमच्यासाठी किती त्याग करू शकतो.
चारित्र्य – त्याचे वर्तन आणि विचार चांगले आहेत का?
सद्गुण – तो दयाळू आणि दानशूर आहे का?
कर्म – तो आपले घर कसे चालवतो आणि त्याची काम करण्याची पद्धत काय आहे?
या गुणांवरून तुम्ही चांगल्याप्रकारे माणसाची पारख करू शकता.
(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
