Numerology Mulank 4 Personality : कुंडली शास्त्राच्या माध्यमातून व्यक्ती आणि तिचे भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रात सोप्या गणिताचा आधार घेऊन व्यक्तीचे विविध पैलू आणि मानसिकता जाणून घेता येते. या संख्याशास्त्रात १ ते ९ अंकांची किमया आहे आणि त्या किमयेमध्ये पडद्याआड नऊ ग्रह उपस्थित असतात. तर, आपण ४ या मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत. कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला वाढदिवस असणाऱ्या मंडळींचा मूलांक ४ असतो.

मूलांक ४ असलेल्या व्यक्ती राजकारण आणि अभिनय क्षेत्रात जाण्याला पसंती दाखवतात. मूलांक ४ असणाऱ्या मंडळींचे व्यक्तिमत्त्व आणि विचारसरणी इतरांपेक्षा वेगळी असते. त्यांना गर्दीतून उठून दिसायला आवडते. प्रत्येक कामात अशा व्यक्ती खोलवर जातात आणि सर्जनशील असतात. चला तर आज आपण त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत…

स्वभाव

अंकशास्त्रानुसार, तुम्ही व्यावहारिक आणि मनमिळाऊ असता. प्रत्येक गोष्टीचे नियोजन करता आणि आयुष्य जगण्यासाठी स्वतःचे वेगळे नियम ठरवता. शिस्तप्रिय, मेहनती, दृढनिश्चयी असता. एकदा ध्येय निश्चित केले की, ते साध्य करण्यासाठी तुम्ही आपले सर्व प्रयत्न पणाला लावतात. कधी हट्टी, तर कधी पटकन राग व्यक्त करता, ज्यामुळे लोकांना तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो.

लव्ह लाईफ

नातेसंबंधात खूप निष्ठावान आणि समर्पित असता. एखादे नाते दीर्घकाळ टिकवण्यावर विश्वास ठेवता. पण, अनेकदा तुम्ही आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाही, ज्यामुळे कधी कधी नात्यांमध्ये दुरावा किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. म्हणून जर जोडीदाराबरोबर तुम्ही मोकळेपणाने संवाद साधायला शिकलात, तर प्रेमी जीवन खूप चांगल्या प्रकारे टिकू शकते.

काम, नोकरी, व्यवसाय

करिअरच्या बाबतीत सांगायचे झाल्यास तुम्ही खूप व्यावहारिक आणि मेहनती असता. संशोधन, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, गुप्तचर, आयटी आणि व्यवसाय यांसारख्या क्षेत्रांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करता. जोखीम पत्करायला घाबरत नाही आणि आपल्या ध्येयाकडे हळूहळू वाटचाल करता.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)