Premium

अपार संपत्ती मिळवण्यासाठी ‘ही’ ३ रत्ने आहेत खूपच फायदेशीर; जाणून घ्या कोण करू शकतात धारण

व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी रत्न शास्त्रामध्ये काही रत्नांबाबत सांगण्यात आले आहे. या रत्नांना धारण केल्याने व्यक्ती अगणित संपत्तीचा स्वामी बनतो.

These 3 gems are very useful for gaining immense wealth
आज आपण ३ खास रत्नांबद्दल जाणून घेऊया. (Photo : Financial Express)

घरातील सुख-समृद्धीसाठी आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कठोर परिश्रम करत असते. परंतु काही वेळा कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीमुळे व्यक्तीला परिश्रम करूनही फळ मिळत नाही. अशा स्थितीत व्यक्तीला अनेकवेळा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी रत्न शास्त्रामध्ये काही रत्नांबाबत सांगण्यात आले आहे. या रत्नांना धारण केल्याने व्यक्ती अगणित संपत्तीचा स्वामी बनतो. आज आपण अशाच ३ खास रत्नांबद्दल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेड स्टोन :

रत्न शास्त्रात अशा अनेक रत्नांबाबत सांगण्यात आले आहे, जे खूप फायदेशीर आहेत. यापैकी एका रत्नाचे नाव जेड स्टोन आहे. ते धारण केल्याने माणूस आर्थिकदृष्ट्या मजबूत होतो. इतकेच नाही तर, हे रत्न धारण केल्याने व्यक्तीची कामाप्रती एकाग्रता वाढते आणि बुद्धीचा विकास होतो. जेड स्टोन पन्नाचा एक रत्न आहे, जो आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत करतो. या रत्नाच्या मदतीने व्यक्ती योग्य व्यावसायिक निर्णय घेऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढवण्यासाठी हे शुभ मानले जाते.

वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीचे लोक कोणत्याही ज्योतिषाच्या सल्ल्याने जेड स्टोन घालू शकतात.

Name Astrology: ‘या’ अक्षराने नाव सुरु होणाऱ्या लोकांना मिळतो कुबेराचा आशीर्वाद; भासत नाही आर्थिक चणचण

ग्रीन अ‍ॅव्हेंच्युरिन रत्न :

जेड स्टोन व्यतिरिक्त आणखी एक रत्न व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करते. ज्योतिष शास्त्रानुसार व्यापार्‍यांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते. आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतात.

ग्रीन अ‍ॅव्हेंच्युरिन रत्न विशेषतः तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते.

टायगर रत्न :

रत्न शास्त्रामध्ये हे रत्न सर्वात वेगवान आणि सकारात्मक प्रभाव दाखवणारे मानले जाते. ते परिधान केल्याने व्यक्तीची प्रबळ इच्छाशक्ती वाढते आणि कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्यास सक्षम होते. असे मानले जाते की ते धारण केल्याने एखाद्या व्यक्तीला रखडलेल्या कामातही गती मिळते.

मिथुन राशीच्या लोकांनी हे रत्न योग्य पद्धतीने धारण केले तर त्यांना शुभ परिणाम पाहायला मिळतात. तसे, कोणत्याही राशीचे लोक हे रत्न घालू शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: These 3 gems are very useful for gaining immense wealth find out who can wear pvp

Next Story
आजचं राशीभविष्य, सोमवार, १६ मे २०२२