Shanidev 2022: शनिदेव असा ग्रह आहे ज्याचा प्रभाव चांगलाही असतो आणि वाईट सुद्धा. जर तो तुमच्या राशीमध्ये चांगली स्थितीत असेल तर तुम्ही नेहमी आनंदी राहाल आणि जर ती वाईट स्थितीत असेल तर तुमच्या आयुष्यात खूप गडबड निर्माण करू शकते. अलीकडेच जुलै महिन्यात शनीने ग्रह मकर राशीत प्रवेश केला आहे, ज्यामध्ये तो ऑक्टोबरपर्यंत विराजमान राहील. म्हणजे शनि ग्रह ३ महिने प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करेल. त्यामुळे ३ राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. तर जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही.

या ३ राशींवर शनिदेवाचा प्रभाव

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत शनिदेव लाभदायक ठरतील. त्यामुळे तुमची प्रतिष्ठाही वाढेल. याशिवाय तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील प्राप्त होऊ शकते. तुमच्या पदोन्नतीचीही जोरदार शक्यता निर्माण झाली आहे. व्यापारी वर्गाला फायदा होईल. उच्च अधिकारी तुमच्या कामावर खूश असतील. एखादं रखडलेलं काम पूर्ण होऊन फायदा होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात सुद्धा चांगले राहतील.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत

( हे ही वाचा: १० ऑगस्टला मंगळदेवाची बदलणार परिस्थिती; ‘या’ तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार मोठी खळबळ)

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी शनि शुभ राहील. ११व्या स्थानात शनिदेव प्रतिगामी आहे. जे नफा कमावतात. या काळात नवीन व्यावसायिक संबंधही तयार होतील. यामुळे तुम्हाला भविष्यात चांगले पैसे मिळतील. व्यवसायातही प्रगती होण्याचे योग आहेत. दुसरीकडे, जर तुमचा व्यवसाय किंवा करिअर शनि ग्रहाशी संबंधित असेल तरच लाभ मिळणार आहेत. एखादा लांबचा प्रवास करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. या काळात चांगला नफा होईल. मात्र, संयमाने वागणे कधीही चांगले आहे.

धनु राशी

धनु राशीच्या दुसऱ्या घरात शनिदेव विराजमान आहेत. हे धन आणि वाणीचे घर मानले जाते. जे शेअर बाजाराशी संबंधित आहेत त्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी देखील पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांकडून देखील कौतुकाची थाप मिळेल. एखादे रखडलेलं काम पूर्ण होऊ नफा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुद्धा आधीपासून असलेले मतभेद दूर होऊन नाते चांगले होऊ शकते. या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)