These dreams are sign of Lakshmi blessing can get more money and become rich astrology | Loksatta

स्वप्न शास्त्रानुसार ‘या’ गोष्टी स्वप्नात दिसणं तुमच्यासाठी फायदेशीर, धनप्राप्तीसह व्यवसायतही होऊ शकते वाढ

एखाद्या व्यक्तीला स्वप्नात जे दिसते ते त्याच्या भविष्याशी निगडीत असू शकते

dream interpretation
स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगवेगळा असतो. बहुतेक लोकांना रात्री झोपेत वेगवेगळ्या प्रकारची स्वप्नं पडतात. (Photo : Freepik)

स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगवेगळा असतो. बहुतेक लोकांना रात्री झोपेत वेगवेगळ्या प्रकारची स्वप्नं पडतात. खरतंर स्वप्न पडणे ही एक सामान्य बाब आहे. पण काही स्वप्ने चांगली असतात तर काही खूप वाईट असतात. शिवाय अनेकदा तर इतकी भयंकर स्वप्न पडतात की ज्यामुळे आपण झोपेतून दचकून जागे होतो. तुम्ही तुमच्या स्वप्नात काय पाहता? याचे वेगवेगळे अर्थही असू शकतात.

असं मानलं जातं की, एखाद्या व्यक्तीला स्वप्नात जे दिसते ते त्याच्या भविष्याशी निगडीत असू शकते. शिवाय स्वप्नांचा प्रभाव खूप मंद असतो, पण तो असतो हे मात्र खरं. स्वप्न शास्त्रात अशी काही स्वप्ने सांगितली आहेत, जी गरिबी दूर करण्याचे संकेत देतात, ही शुभ स्वप्ने आर्थिक लाभाच्या मार्गातील अडथळे कमी करतात, तर कधीकधी ही स्वप्ने इतकी प्रभावी असतात की त्यांच्यामुळे आपणाला पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होते.

तुमचे भाग्य उजळेल –

हेही वाचा- शनिदेव चांदीच्या पाऊलांनी मार्गी होताच ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? वर्षभर मिळेल प्रचंड धनलाभाची संधी

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात उघडे दार दिसले तर हे स्वप्न सूचित करते की, तुमचे नशीब लवकरच पालटण्याची शक्यता आहे. तुमचे सर्व त्रास लवकरच संपू शकतात. स्वप्नात दरवाचा पाहण्याचा अर्थ काय असतो ते आपण स्वप्न शास्त्रानुसार जाणून घेऊया.

सकाळी ‘हे’ स्वप्न पाहणे खूप शुभ माणले जाते –

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात उघडा दरवाजा पाहणे एक विशेष सूचना देते. हे स्वप्न सकाळी पाहणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात बाहेरून घर दिसत असेल आणि त्याचा दरवाचा उघडा असेल तर हे स्वप्न चांगले असू शकते. याचा अर्थ तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडले असून तुमची रखडलेले सर्व काम पूर्ण होऊ शकतात.

चांगलं अन्न खाणे –

स्वप्न शास्त्राचा असा विश्वास आहे की, ज्या लोकांना चांगले अन्न खात असल्याचे स्वप्न पडते, त्यांच्यासाठी धनलाभाचा इशारा असतो. असे मानले जाते की, जेवणाशी संबंधित स्वप्ने पाहणं हे येणाऱ्या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील आणि प्रगती होण्याची शक्यता वर्तवते.

स्वप्नात बंद दरवाचा दिसणे –

हेही वाचा- ३० वर्षांनी शनिच्या राशीत राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील श्रीमंत? धनलाभ व प्रतिष्ठेची मोठी संधी

स्वप्नात बंद दरवाजा दिसणे फार अशुभ मानले जाते. हे स्वप्न नकारात्मक ऊर्जा आणते, जे तुमचे नुकसान देखील करू शकते. या स्वप्नाचा अर्थ तुमच्या चालू कामात काही अडथळे येऊ शकतात. तुमच्याकडील पैशाचा ओघ काही काळ थांबू शकतो शिवाय तुमच्या नोकरी आणि व्यवसायात अडथळे येण्याची शक्यता असते.

स्वप्नात झाडू पाहणे –

झाडू देवी लक्ष्मीला खूप प्रिय असल्याचं माणलं जाते, त्यामुळे झाडू हे धनाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. असं म्हणतात की, ज्यांना स्वप्नात झाडू दिसतो, त्यांची गरिबी नष्ट होते आणि त्यांना धनलाभ होण्याची शक्यता असते. शिवाय असं स्वप्न पडल्यास ते आपल्या पत्नीला किंवा आईला सांगितले पाहिजे असंही म्हणतात.

स्वप्नात पाणी पाहणे शुभ की अशुभ?

हेही वाचा- Name Astrology: ‘या’ अक्षराने नाव सुरु होणारी लोकं असतात भाग्यवान? प्रचंड संपत्तीसह मिळू शकते अपार यश

स्वप्न शास्त्रानुसार, तुम्हाला जर स्वप्नात पाऊस दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. स्वप्नात पाऊस दिसणं म्हणजे धनलाभ आणि भौतिक लाभ होऊ शकतात. अशी स्वप्न तुम्हाला चांगली काही चांगली बातमी मिळेल आणि तुमचे रखडलेले काम पूर्ण होणार असल्याचे संकेतही माणले जातात. दुसरीकडे, जर तुम्ही स्वप्नात मुसळधार पाऊस पडताना पाहात असाल तर देवी लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देण्याचे संकेत असू शकतात. ज्यामुळे तुमची व्यवसायात आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता असते. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात स्वच्छ पाणी दिसले तर ते शुभ मानले जाते.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 20:18 IST
Next Story
३ महिन्यांनी गुरुदेव होणार अस्त; ‘या’ ३ राशींना धनहानी होण्याची शक्यता