scorecardresearch

वसंत पंचमीपासून ‘या’ राशी होतील धनवान? माता सरस्वतीच्या कृपेने तुम्हीही होऊ शकता अपार श्रीमंत

वसंत पंचमीचा दिवस वर्षातील काही विशेष शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. यावेळी काही राशी आहेत ज्यांना यावेळी प्रंचड धनलाभाची संधी उपलब्ध होऊ शकते. चला तर जाणून घेऊया या राशींबद्दल..

vasant panchami 2023
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

विद्या आणि बुद्धीची देवी माता सरस्वतीची माघ शुक्लाच्या पाचव्या दिवशी पूजा केली जाते. या पूजेच्या सणाला वसंत पंचमी असे म्हणतात. वसंत पंचमीचा दिवस वर्षातील काही विशेष शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे याला ‘अबूज मुहूर्त’ असेही म्हणतात. याकाळात लग्न, नवीन बांधकाम यासह अनेक शुभ कार्ये करता येतात. यावेळी २६ जानेवारीला वसंत पंचमीचा सण साजरा होत आहे. यावेळी काही राशी आहेत ज्यांना यावेळी प्रंचड धनलाभाची संधी उपलब्ध होऊ शकते. चला तर जाणून घेऊया या राशींबद्दल..

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी वसंत पंचमीपासून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे पुन्हा मिळू शकतात. तसंच याकाळात तुम्हाला कुटुंबाची साथ मिळू शकते. कुटुंबाच्या सल्ल्याने केलेली कामे लवकर पूर्ण होतील. तसच तुमच्या जोडीदारासोबतचे नाते सुधारेल. आधीपासून सुरू असलेले मतभेद दूर होतील.

कन्या राशी

वसंत पंचमीचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. याकाळात कोणताही निर्णय घेताना विचार करून घ्या. याकाळात पैशांशी संबंधित विषयांवर जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. तसंच याकाळात तुम्हाला आर्थिक धनलाभ देखील होण्याची शक्यता दिसतेय. यामध्ये तुम्हाला कुटुंबाची साथ देखील मिळणार आहे. याकाळात तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल.

( हे ही वाचा: २ महिन्यांनी शनिदेव बनवणार ‘धन राजयोग’; ‘या’ ३ राशींना वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा)

तूळ राशी

वसंत पंचमीच्या दिवसापासून तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी तुमचे आरोग्य उत्तम राहील. याकाळात कुठेही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर पैसे जपून वापरा. याकाळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तसंच आर्थिक स्तिथीही सुधारेल. मात्र कोणताही निर्णय घेताना विचार करून घ्यावा लागेल.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशींचे लोकं यावेळी लांबचा प्रवास करू शकतात. तसंच याकाळात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची साथ मिळेल. तसंच जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद यावेळी सुधारतील. याकाळात तुमचा समाजातील मान सन्मान वाढेल. तसंच आर्थिक स्तिथीही सुधारेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 16:30 IST