पुढील ३५ दिवस शनिदेव होणार अस्त; आजपासून 'या' ४ राशींना 'या' रूपात धनहानीचा धोका | these zodiac signs Should be careful as shani asta will be next 35 days according to astrology nss 91 | Loksatta

पुढील ३५ दिवस शनिदेव होणार अस्त; आजपासून ‘या’ ४ राशींना ‘या’ रूपात धनहानीचा धोका

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी अस्त आणि उदयाला जात असतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होत असतो.

Shani Asta In Kumbh:
पुढील ३५ दिवस शनिदेव होणार अस्त (Image-Graphic Team)

Shani Asta In Kumbh: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी अस्त आणि उदयाला जात असतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होत असतो. याचा प्रभाव सर्व राशींवरही होण्याची शक्यता आहे. पण चार राशी अशा आहेत, ज्यांना पुढील ३५ दिवस सावध राहण्याची आवश्यकता आहे. जाणून घेऊयात या राशींबद्दल सविस्तर माहिती.

मिथुन राशी

शनिदेवाचं अस्त होणं मिथुन राशीसाठी काही प्रमाणात धोकादायक ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीत शनिदेव आयु आणि भाग्याचा स्वामी होऊन अस्त होणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला नशिबाची साथ कमी मिळण्याची शक्यता आहे. तसंच आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ करू नका. जर तुम्ही व्यापारी असाल, तर या कालावधीत तुमच्या व्यापारात प्रगतीच्या रूपातच धोक्याचे संकेत आहेत त्यामुळे अतिशय सावधपणे तुम्ही व्यापार करा.

कर्क राशी

या राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचं अस्त होणं हानिकारक ठरू शकतं. कारण तुमच्या मृत्यूस्थानात शनिदेव अस्त होणार आहेत. आरोग्य जपा. जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी नवीन कामाची सुरुवात करणे टाळावे. व्यापारात नवीन गुंतवणूक करताना सावध राहा.

धनु राशी

शनिदेवाचं अस्त होणं धनु राशीच्या लोकांना प्रभावित करु शकतं. कारण शनिदेव तुमच्या राशीत स्थिर होताच आरोग्यासंदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात. घसा आणि तोंडाच्या समस्या जाणवू शकतात. शरीरात अनेक संसर्गाची भीती आहे. तसंच तुमच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. या कालावधीत पैसे उधार देणे टाळावे. धनहानीही होण्याची शक्यता आहे.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचं अस्त होणं आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक होऊ शकतं. कारण तुमच्यावर शनिची साडेसातेही सुरु झाली आहे. तसंच शनिदेव तुमच्या कुंडलीत बाराव्या स्थानात विराजमान झाले आहेत. त्यामुळे तुमच्यावर खोटे आरोप लावले जाण्याची शक्यता आहे. तसंच अतिरिक्त खर्च होऊ शकतो. तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला एखादा प्रकल्प सुरु करण्यासाठी थोडे थांबण्याची गरज आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 15:13 IST
Next Story
होळीनंतर ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकणार? गुरुदेव देणार प्रचंड धनलाभाची संधी