Premium

गुरुदेवाच्या गोचरामुळे ‘या’ राशींना मिळणार भरपूर पैसा? २०२४ सुरु होण्याआधीच होऊ शकता प्रचंड श्रीमंत

डिसेंबर महिन्याच्या शेवटी गुरु त्याच्या चालीत बदल करणार आहे.

Guru Gochar
गुरु राशी परिवर्तन. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Guru Gochar : दोन दिवसांनी या वर्षातील शेवटच्या म्हणजे डिसेंबर महिन्याला सुरुवात होत आहे. तर या महिन्याच्या शेवटी गुरु ग्रह त्याच्या चालीत बदल करणार असून तो ३१ डिसेंबर रोजी मार्गी होणार आहे. गुरु मार्गी झाल्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. ज्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात शुभ योगाने होणार आहे. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजून ८ मिनिटांनी गुरु ग्रह मार्गी होईल, ज्याचा सर्व राशींवर परिणाम दिसून येणार आहे. गुरूच्या राशीत बदल झाल्यामुळे काही राशींना भरपूर लाभ होऊ शकतो, तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनु रास

धनु राशीच्या लोकांना गुरूच्या चालीत होणार बदल खूप फायदेशीर ठरु शकतो. गुरु हा धनु राशीचा स्वामी मानला जातो. अशातच गुरु धनु राशीच्या ५ व्या स्थानी प्रवेश करणार आहे, ज्यामुळे या काळात व्यापाऱ्यांना दुप्पट नफा मिळू शकतो. तसेच तुमच्या कुटुंबात सुख-शांती नांदू शकते आणि आर्थिक लाभही होण्याची शक्यता आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी गुरूचा राशी बदल फायदेशीर मानला जात आहे. कर्क राशीच्या दहाव्या स्थानी गुरु गोचर करणार आहे. गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन काम सुरू करण्यासाठीही हा काळ शुभ ठरु शकतो.

हेही वाचा- डिसेंबर महिन्यात ‘या’ राशींचे नशीब पालटणार? ५ मोठे ग्रह राशी परिवर्तन करताच ‘अच्छे दिन’ सुरु होण्याची शक्यता

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी वर्षाच्या शेवटी होणारे गुरुचे गोचर लाभदायक ठरु शखते. गुरु सिंह राशीच्या नवव्या स्थानी प्रवेश करणार आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढून तुम्हाला खूप सन्मान मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना या काळात खूप फायदा होई शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: These zodiac signs will get a lot of money due to guru gochar you can become very rich before 2024 starts jap

First published on: 28-11-2023 at 10:38 IST
Next Story
Daily Rashi Bhavishya : ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार, पाहा तुमचे भविष्य