Success Advice From acharya Chanakya niti : आचार्य चाणक्य यांनी आपले जीवन सुखी, समाधानी व सुंदर बनवण्यासाठी अनेक लहान सहान बारकावे सांगितल्याचे मानले जाते. आचार्यांचे हे बोध आज जगभरात चाणक्य नीती रूपात प्रसिद्ध आहेत. चाणक्यांनी जगाला अनेक प्रकारचे मोलाचे सल्ले दिले आहेत. त्यांनी यश मिळवण्यासाठी अनेक युक्त्याही सांगितल्या आहेत. या शिकवणी आपल्या जीवनात अंमलात आणून आपण यश मिळवू शकतो.

शंभर प्रकारचे अपयश पचवल्यानंतर यशाची गोडी चाखायला मिळते असं म्हणतात. मात्र त्यासाठी शंभर वेळा पडूनही पुन्हा उभं राहण्याची तयारी, जिद्द मनात असावी लागते. अनेकदा सततच्या अपयशाने खचून जाऊन आपण जीवनामध्ये निराशेच्या कवेत जायला लागतो. पण अपयश, का येते याबद्दल आचार्य चाणक्य सांगणार आहेत. चाणक्य नीती सांगते की, जीवनात यश आणि अपयश दोन्ही आवश्यक आहेत. पण, पुढील २ गोष्टींना घाबरणारा व्यक्ती यशस्वी होत नाही. तर या २ गोष्टी कोणत्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात…

टीका

आचार्य चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती टीकेच्या भीतीने एखादे काम करणे टाळते, ती कधीही पुढे जाऊ शकत नाही. चाणक्यांनी टीकेला माणसाची सर्वात मोठी भीती म्हटले आहे. टीका ही एका संधीसारखी आहे; त्यातून शिका आणि पुढे जा. पुढे, यशासाठी काही सल्ले देताना चाणक्य म्हणाले की, जर कोणाला यशस्वी व्हायचे असेल, तर त्याने इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून आपले ध्येय गाठले पाहिजे.

अडचणींपासून पळणे

अडचणी हा मानवी जीवनाचा एक भाग आहे आणि चाणक्याच्या मते, अडचणी आल्यावर आपण घाबरू नये. चाणक्य म्हणाले की, जे अडचणींना घाबरतात त्यांना कधीही यश मिळत नाही. चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, अडचणी माणसाची परीक्षा घेतात आणि जे त्यावर मात करतात ते अधिकच आकर्षित दिसतात. म्हणून, जर तुम्ही अडचणींना घाबरलात, तर तुम्ही कधीही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)