Shani Margi : ग्रहाचे न्याय‍धीश शनि १५ नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या स्वराशी कुंभ राशीमध्ये मार्गी होणार आहे. शनिच्या चालीमध्ये बदल झाल्यामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे तर काही राशींना काळजी घेण्याची गरज आहे. शनि त्याच्या चालीने राशिचक्रातील बारा राशींवर प्रभाव टाकणार आहे. यामुळे काही राशींना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या? (three zodiac signs should be alert from 15 november they may have to face difficulties due to the Saturn margi)

हेही वाचा : १२ नोव्हेंबर पंचांग: देवउठनी एकादशीला १२ पैकी ‘या’ राशींच्या जीवनात होतील मोठे बदल; कोणाला पावणार भगवान विष्णू देव? वाचा तुमचे राशिभविष्य

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

सिंह राशी (Leo Zodiac)

शनिच्या या चालीमुळे सिंह राशीच्या लोकांना थोड्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. पैसे संपत्तीच्या बाबतीत काळजी घ्यावी अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. या दरम्यान या लोकांचे जवळच्या लोकांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर रहा. नोकरीमध्ये बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांनी आता थोडी प्रतिक्षा करावी. व्यवसाय करणाऱ्या लोकांना सर्तक राहण्याची गरज आहे. त्यांनी कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलताना विचार करावा.

हेही वाचा : शनिदेव ३० वर्षांनंतर मीन राशीत होणार वक्री, २०२५ पासून उजळणार ‘या’ राशींचे भाग्य; मिळेल भरपूर सुख अन् आर्थिक लाभ

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनिचे मार्गक्रमण तोट्याचे ठरू शकते. कामाच्या ठिकाणी या लोकांना संघर्ष करण्याचा सामना करावा लागतो. या दरम्यान गुंतवणूक करू नये. व्यवसाय वाढवण्याचा विचार करू नये. अति खर्चामुळे तणाव येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसाय करणाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.

हेही वाचा : १९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश

मकर राशी (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी शनिची चाल अडचणी आणू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना भरपूर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. धन संपत्तीचे नुकसाना होऊ शकते. प्रेम प्रकरणांमध्ये चढ उतार येऊ शकतो. लहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात. त्यामुळे या लोकांनी त्यांच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे आणि कोणतेही पाऊल उचलताना काळजी घ्यावी.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader