19th September Rashi Bhavishya & Panchang : आज १९ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच गुरुवारी संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांपर्यंत वृद्धी योग जुळून येईल. तसेच आज उत्तरा भाद्रपद नक्षत्र सकाळी ८ वाजून ०४ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे, त्यानंतर रेवती नक्षत्र दिसेल. आज राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजपर्यंत असेल. कृष्ण पक्षाच्या द्वितीय तिथीला श्राद्ध केलं जातं असं म्हणतात. तर आजचा दिवस १२ राशींसाठी कसा असणार आहे हे आपण जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- मनाची चंचलता जाणवेल. अती विचार करू नका. केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा. कार्यक्षेत्रात मान मिळवाल. मुलांच्या प्रगतीने आनंद होईल.

वृषभ:- कामे मनाप्रमाणे मार्गी लावाल. जमिनीचे व्यवहार कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम संबंधात गैरसमज टाळा. अधिकारी वर्ग सकारात्मक बातमी देतील.

मिथुन:- इतरांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्याल. नवीन कामे हाती येतील. कौटुंबिक सदस्यांशी मतभेद संभवतात. बौद्धिक कसोटी लागू शकते.

कर्क:- लहान प्रवास कराल. वडीलधार्‍यांना विरोध करू नका. जुने ठरवलेली कामे पूर्ण कराल. विरोधकांच्या कारवाया मावळतील. हस्तकलेत चिकाटी बाळगा.

सिंह:- मानसिक रित्या खंबीर रहा. तूर्तास धाडसी निर्णय नकोत. कुटुंबासाठी काही खरेदी कराल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन विचार तत्काल अंमलात आणावा.

कन्या:- किरकोळ गोष्टींमुळे मनस्ताप वाढू शकतो. तडजोडीला पर्याय नाही. कामात एकाग्रता ठेवा. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. मित्रांना मदत कराल.

तूळ:- अघळपघळ शब्द वापरू नका. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. तुमच्या बुद्धिकौशल्यावर लोक खुश होतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. लहान भावंडांना मदत कराल.

वृश्चिक:- मुलांबरोबर वेळ घालवाल. क्रोध वृत्तीत वाढ होऊ शकते. दिवसाची सुरवात मेहनतीत जाईल. फिरायला जाण्याची इच्छा प्रबळ होईल. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल.

धनू:- नातेवाईकांच्या गाठी पडतील. कौटुंबिक कामाने थकून जाल. तरुण वर्गाकडून काही नवीन शिकायला मिळेल. मनोकामना पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

मकर:- मुलाखतीत यश येईल. भावंडांची इच्छा जाणून घ्या. कामात उत्साह जाणवेल. दिवसभराच्या कामाचे चिंतन करा. व्यवसायात चांगला नफा मिळेल.

कुंभ:- योग्य ठिकाणी गुंतवणुकीवर भर द्या. क्षुल्लक गैरसमजूत वाद वाढवू शकते. चर्चेतून नवीन कल्पना सुचतील. मानसिक चलबिचलता वाढवू नका. भावंडांची मदत घ्यावी.

मीन:- घाई-घाईने कामे करू नयेत. नियोजनावर अधिक भर द्यावा. सासुरवाडीचे लोक मदत करतील. अनावश्यक खर्चाला आळा घालावा. नवीन कामाची रूपरेषा आखावी.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thursday 19th september rashi bhavishya marathi panchang vrudhi yog will give you which zodic signs success prosperity fame read marathi horoscope asp