22nd February Horoscope Marathi: गुरुवार, २२ फेब्रुवारी : आज गुरुपुष्यामृत योग आहे. हा योग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल पाहा. आज काही राशींच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. कसे असेल तुमच्या राशीचे ग्रहमान जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष:-काहीशी चिडचिड वाढेल. लहान मुलांमध्ये रमून जाल. नवीन मित्र जोडले जातील. सरकारी कामात वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.

वृषभ:-मनातील इच्छा पूर्ण होईल. मानसिक चांचल्य जाणवेल. घरापासून दूर जावे लागेल. मनातील गैरसमज काढून टाकावेत. कामात स्त्रियांची मदत मिळेल.

मिथुन:-अपचनाचा त्रास जाणवेल. कामात चालढकल करू नका. हित शत्रूंवर लक्ष ठेवावे. शारीरिक उष्णता वाढेल. जनविरोधाकडे दुर्लक्ष करावे.

कर्क:-कामाची धांदल उडेल. प्रलोभनाला बळी पडू शकता. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. मुलांची चिंता लागून राहील. पैज जिंकण्याची इच्छा बाळगाल.

सिंह:-वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. घरातील समस्यांकडे अधिक लक्ष द्या. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष असू द्या. नव्या संधीची वाट पहावी. जुने आजार दुर्लक्षित करू नका.

हेही वाचा : मार्च सुरु होताच ‘या’ ४ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? चार मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?

कन्या:-वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. घरातील गोष्टी जाणून घ्याव्यात. भावंडांशी मतभेद संभवतात. स्वमतावर आग्रही राहाल. संघर्षाला बळी पडू नये.

तूळ:-आर्थिक बाजूचा नीट विचार करावा. जरूरी नसतांना उदार होऊ नका. स्वभावात लहरीपणा राहील. वादविवाद घालू नका. डोळ्याचे त्रास जाणवू शकतात.

वृश्चिक:-कामात हटवादीपणा येईल. महत्त्वाकांक्षा वाढेल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल. इतरांचाही विचार करावा.

धनू:-जबाबदारीने वागाल. मनात कसलीशी काळजी लागून राहील. प्रवासात काळजी घ्यावी. घरातील काही गोष्टी बदलाव्या लागतील. कौटुंबिक प्रश्न सोडवावेत.

मकर:-खर्चाचे गणित जमवावे लागेल. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. जुन्या गोष्टी काढत बसू नका. कामाचा ताण राहील.

कुंभ:-बदललेल्या गोष्टी नीट समजून घ्याव्यात. कामात चंचलता राहील. मित्रांचा रोष वाढू शकतो. झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक समाधान असेल.

मीन:-दिवस मनासारखा घालवाल. दोन पाऊले मागे येण्यास घाबरू नका. स्थावरच्या कामातून लाभ संभवतो. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. कामात प्रगती कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thursday 22nd february panchang daily horoscope mesh to meen rashi bhavishyahow will gurupushyamrut yoga effect on your zodiac how will your day go find out dha
First published on: 21-02-2024 at 19:00 IST