29th February Horoscope Marathi: आज २९ फेब्रुवारी, गुरुवार पंचांग : लीप वर्षामुळे, चार वर्षांनी आलेला आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल जाणून घ्या. कोणत्या राशींच्या भाग्यात घर खरेदीचा योग आहे, कोणाच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकता पाहा.

मेष:-स्पर्धेत बक्षीस मिळेल. आनंदी वृत्तीने वागाल. बौद्धिक तरलता दिसून येईल. अभ्यासूपणे निर्णय घ्याल. जुगाराची आवड पूर्ण कराल.

Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव
Surya Grahan 2024
गुढीपाडवा, चैत्र नवरात्रीआधी ‘या’ राशी होणार श्रीमंत? वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात सोन्यासारखं चमकू शकतं भाग्य
Gudhi Padwa Amrut Siddhi Yog Chaitra Navratri To Ram Navami In 2024
अमृत सिद्धी योगात आला गुढीपाडवा; चैत्र नवरात्री ते रामनवमी ५ वेळा रवी योग, ‘या’ ३ राशींना लाभेल नशीब बदलणारं वरदान
Holi 2024 Shani Maharaj Nakshatra Gochar Before Gudhi Padwa
होळीनंतर शनी महाराज नक्षत्र बदलणार, गुढीपाडव्याआधी मेष ते मीनपैकी कुणाला होईल धनलाभ? १२ राशींचे भविष्य पाहा

वृषभ:-आपल्याच मतावर ठाम राहाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. मनातील गैरसमज बाजूस सारावेत. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कमिशन च्या कामात लक्ष घालाल.

मिथुन:-जोडीदाराचे म्हणणे जाणून घ्यावे. जवळचा प्रवास सुखकारक होईल. उगाच नसत्या गोष्टी उकरून काढू नका. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्याल. विविध विषयात रुचि दाखवाल.

कर्क:-बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. कौटुंबिक दिमाख दाखवाल. हातातील कामाकडे लक्ष द्यावे. अचानक झालेले बदल स्वीकारावेत. भावंडांना मदत करावी.

सिंह:-इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे लक्ष द्यावे. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.

हेही वाचा : Sankashti Chaturthi 2024 : लाडक्या बाप्पाच्या नावावरून ठेवा तुमच्या बाळाचे नाव, एकापेक्षा एक भन्नाट नावांची यादी

कन्या:-मनातील नसत्या चिंता बाजूस साराव्यात. द्विधा मन:स्थितीतून बाहेर यावे. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.

तूळ:-मनातील इच्छा पूर्ण होतील. दिवस आळसात घालवाल. मनात मोठमोठ्या कल्पना रचल्या जातील. भावंडांशी मतभेद संभवतात. स्त्री समूहात वावराल.

वृश्चिक:-सामाजिक वजन वाढेल. घरासाठी नवीन काहीतरी खरेदी केले जाईल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न कराल. पराक्रमाला वाव मिळेल.

धनू:-अतातायीपणे निर्णय घेऊ नका. धार्मिक कार्यात सहभाग नोंदवाल. धर्मादाय संस्थेस मदत कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मकर:-अति विचार करू नका. कामे वेळेत पूर्ण करण्यास भर द्या. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. चिकाटी सोडून चालणार नाही. अचानक धनलाभ संभवतो.

कुंभ:-बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. जोडीदाराच्या सहकार्याने कामे पार पडतील मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील. कामात चंचलता आणू नका. काही गोष्टी काटेकोरपणे कराव्यात.

मीन:-इतरांच्या आनंदात आनंद मानाल. सर्वांना गोड बोलून आपलेसे करावे. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. प्रवासात त्रास संभवतो.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर