Daily Horoscope 27 July 2026 In Marathi : आज २७ जुलै २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील त्रयोदशी तिथी संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत राहील. आज सकाळी १० वाजून २९ मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र जागृत असेल आणि त्याचबरोबर रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत वैधृति योग जुळून येईल. राहू काळ ७ वाजून ५२ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून २९ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजात मुहूर्त १२ वाजून १९ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे. आठवड्याची सुरुवात तुमच्या राशीसाठी कशी असणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, २५ जुलै २०२६ (Today Horoscope 25 July 2026 In Marathi)
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
विद्यार्थ्यांना चांगला काल. महिला वर्ग खुश राहील. जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने मन दुखावेल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते. जोडीदाराची कृती खटकू शकते.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
योग्य तर्क करावा लागेल. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. गुंतवणूक लाभदायक ठरेल. योग्य मूल्यमापन करावे. अति अपेक्षा ठेऊ नका.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
मानसिक समाधान लाभेल. स्वत:ला बंधनात अडकवू नका. दिवसाची सुरुवात आनंदात होईल. आर्थिक बाजू बळकट करावी. एकाच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
देणी-घेणी मिटतील. दिवस आळसात जाईल. अति विचार करण्यात वेळ वाया घालवाल. घराबाहेर वावरतांना योग्य काळजी घ्यावी. हट्टीपणा सोडावा लागेल.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
छंद जपण्यासाठी वेळ काढावा. दिवस अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकार्यांचा पाठिंबा मिळेल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
तडकाफडकी निर्णय घेऊ नका. शेजारधर्म पळवा लागेल. वादाचा मुद्दा जिंकाल. कशाचाही गैरफायदा घेऊ नका. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
प्रबळ इच्छेवर कामे होतील. उधार-उसनवार नको. प्रेरणा प्रामाणिक हवी. नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील. औद्योगिक व्यवहारात चोख रहा.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
कायदेशीर सल्ला घ्यावा. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या. मुलांचा विचार समजून घ्या. प्रलंबित येणी मिळू शकतील.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
मोठे व्यवहार करताना सावधान. अफवांवर विश्वास ठेऊ नका. परिस्थितीत सुधारणा होईल. मन विचलित होऊ देऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज टाळा.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
प्रलंबित गाठी घेता येतील. अचूक माहिती मिळवावी. बौद्धिक क्षमता वाढीस लावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जवळचा प्रवास पुढे ढकलावा.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
अधिकार्यांच्या सल्ल्यानेच वागावे. कुटुंबात मन रमेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल. प्रवास पुढे ढकलावा.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
घराचे व्यवहार मार्गी लावावेत. मनाची चंचलता वाढेल. फार कडक धोरण घेऊ नका. आततायीपणे कृती करू नका. बहुतांश गोष्टी काळावर सोडाव्यात.
