Aajche Rashi Bhavishya 29 August 2026 In Marathi : आज २९ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. आज पूर्वा भाद्रपद नक्षत्र जागृत होईल आणि धृती योग जुळून येणार आहे. राहू काळ ९ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होईल ते ११ वजवून ५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजात मुहूर्त १२ वाजून १४ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ४ मिनिटांपर्यंत असणार आहे. शनिवार तुमच्या राशीसाठी कसा असणार दिवस चला जाणून घेऊयात.
आजचे पंचांग व राशिभविष्य, २९ ऑगस्ट २०२६ (Dainik Rashi Bhavishya 29 August 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
गूढ गोष्टीं बद्दल कुतुहल निर्माण होईल. हातून सत्कर्म घडेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. सासरच्या व्यक्तींकडून लाभ संभवतो.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
मनाची चंचलता वाढू शकते. पूजा-अर्चा मध्ये मन रमवाल. आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा वापर करा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मिळकतीत वाढ होण्याची शक्यता.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
स्वत:च्या हिंमतीवर विश्वास ठेवा. भागीदारीच्या व्यवसायात वाढ करता येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाची योग्य पावती मिळेल. धन संचयात वाढ होईल.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
प्रलंबित कामे सामोरी येतील. भावनात्मक विचार करू नका. चुकीच्या गोष्टींना खत-पाणी घालू नका. दिवस धावपळीत जाईल. कष्टाला पर्याय नाही.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
देणी चुकती करावी लागतील. विद्यार्थ्यांची कामे मार्गी लागतील. पत्नीचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचा फार ताण घेऊ नका. विरोधक नरमाईचे धोरण स्वीकारतील.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
बुद्धिमत्तेचा कस लागू शकतो. मनातील इच्छा पूर्णत्वास न्याल. एकाच गोष्टीवर अडकून राहू नका. मित्रांची मदत घ्यावी लागेल. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करा.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
जोडीदाराचा वरचष्मा राहील. हातातील अधिकाराने कामे पूर्णत्वास जातील. अधिकार्यांच्या सल्ल्याने वागावे. फक्त कामावर लक्ष केन्द्रित करा. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
कामाचा मनापासून आनंद घ्याल. सरकारी कामे पुढे सरकतील. तरुण वर्गाकडून नवीन शिकावयास मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सहकार्यांकडून फार अपेक्षा बाळगू नका.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
दृष्टीकोनात बदल करून पहावा. सामाजिक प्रतिष्ठा जपा. शेअर्स मधून लाभ संभवतो. मैदानी खेळाची आवड निर्माण होईल. आर्थिक लाभावर लक्ष केन्द्रित करा.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
पत्नीशी वाद वाढवू नका. मुलांची बाजू जाणून घ्या. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुमची प्रगती इतरांच्या नजरेत खुपू शकते. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
इतरांचा विश्वास कमवावा. भावंडांशी मतभेदाची शक्यता. नवीन संधीकडे बारकाईने लक्ष ठेवा. सासरच्या मंडळींकडून लाभ होईल. वादाचे मुद्दे टाळावेत.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
सौम्य शब्दांत मत मांडा. प्रेम-प्रकरणात सबुरीने वागा. राजकीय क्षेत्रातून लाभ संभवतो. अति तिखट पदार्थ खाऊ नका. करमणुकीत जास्त वेळ घालवाल.
