01 September Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज १ सप्टेंबर भाद्रपद कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आणि रविवार आहे. आत पूर्ण दिवस चतुर्दशी तिथी असणार असून ती सोमवारी पहाटे ५ वाजून २२ मिनिटांपर्यंत राहील. तर परीघ योग १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत राहील.तसेच आश्लेषा नक्षत्र रविवारी रात्री ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राहील.
तसेच आज सप्टेंबर महिन्याचा पहिल्या दिवस असण्याबरोबरच मास शिवरात्री व्रत देखील आहे.या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. त्यामुळे भगवान शिव शंकराच्या कृपेने आजचा दिवस मेष ते मीन सर्व राशींसाठी कसा जाईल, आज कोणकोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणत्या राशींना नुकसान होईल, हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…
१ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य : ( 1 September 2024 Rashi Bhavishya )
मेष:- मित्र व नातेवाईकांशी जपून व्यवहार करा. कचाट्यात सापडू नका. आपली ऊर्जा कामी लावा. वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका. रागावर नियंत्रण ठेवावे.
वृषभ:- स्वत:ला सतत गुंतवून ठेवा. मन स्थिर ठेवा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मित्रांशी मतभेद वाढवू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या.
मिथुन:- कौटुंबिक समाधान लाभेल. डोक्यावरचा ताण हलका होईल. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. काही समस्यांचे निराकरण होईल. भविष्याचा विचार करून योजना आखा.
कर्क:- घरासाठी खरेदी कराल. आत्ममग्न राहाल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करा. दिवस मनाजोगा घालवाल.
सिंह:- कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल. नीतिचा मार्ग अवलंबाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आत्मविश्वास वाढीस लागेल. लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवा.
कन्या:- मनाचा गोंधळ टाळावा. कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल. दिवस मावळताना थकवा जाणवेल. मनात एखादी नवीन कल्पना रूजेल.
तूळ:- वाहन जपून चालवा. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पद आणि अधिकार वाढेल. व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात. मित्रांचा सल्ला घ्याल.
वृश्चिक:- आहाराची पथ्ये काटेकोरपणे पाळावीत. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका. दिनक्रम व्यस्त राहील. नकारात्मक विचार दूर ठेवावेत. घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल.
धनू:- आज नवीन चैतन्य जाणवेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. मदतीचे समाधान मिळेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पार पाडाल.
मकर:- जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा. प्रलोभनापासून दूर रहा. वरिष्ठांना नाराज करू नका. जबाबदार्या वाढतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.
कुंभ:- तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाहन खरेदीच्या योजना आखाल. धनसंचय वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे. सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल.
मीन:- गरज ओळखून पैसे खर्च कराल. घरी पाहुणे येतील. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कार्यक्षेत्रात विशेष ध्येय साध्य होईल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd