Today Horoscope 2 March 2026: आज २ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असणार आहे. ही तिथी सांयकाळी ०५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत राहील. त्याचबरोबर अश्लेषा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ०३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज होलिका दहन म्हणजेच होळी आहे.
‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. तर आजचा हा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, २ मार्च २०२६ (2 March Rashibhavishya in Marathi)
मेष राशिभविष्य (Today Aries Horoscope in Marathi)
कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे. समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. विषय वासना वाढू शकते. हौसेचे मोल लक्षात घ्याल.
वृषभ राशिभविष्य (Today Taurus Horoscope in Marathi)
दिवस घाईगडबडीत जाईल. खिलाडु वृत्तीने वागाल. मित्रांशी पैज लावाल. बुद्धिकौशल्याने कामे करण्याकडे कल राहील. उपासनेसाठी वेळ काढावा.
मिथुन राशिभविष्य (Today Gemini Horoscope in Marathi)
कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे. बागबगीच्याच्या कामात गुंग व्हाल. समोरील सर्व गोष्टीत आनंद मानाल. घरगुती कामे सुरळीत पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
कर्क राशिभविष्य (Today Cancer Horoscope in Marathi)
बौद्धिक छंद जोपासाल. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. जास्त चौकसपणा दाखवाल. साहित्य प्रेम दर्शवाल. भावंडांच्या सहवासात जुन्या आठवणीत रमाल.
सिंह राशिभविष्य (Today Leo Horoscope in Marathi)
आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल. भागीदारीच्या कामात काही नवीन बदल करावेत. कचेरीच्या कामात वेळ लागू शकतो. सामाजिक संबंध जपावेत.
कन्या राशिभविष्य (Today Virgo Horoscope in Marathi)
आपल्या इच्छेला अधिक महत्व द्याल. स्वत:चे म्हणणे खरे कराल. इतरांबद्दल मत बनवण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती प्रसंग शांतपणे हाताळावेत. काही कामे फार कष्ट न घेता पार पडतील.
तूळ राशिभविष्य (Today Libra Horoscope in Marathi)
मानसिक चंचलता जाणवेल. उगाचच नसत्या काळज्या करत बसाल. ध्यानधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. हातातील अधिकाराची जाणीव ठेवावी. आर्थिक उलाढाल सावधगिरीने करावी.
वृश्चिक राशिभविष्य (Today Scorpio Horoscope in Marathi)
व्यावसायिक लाभ सुनिश्चित करावा. मित्रांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांना खुश करता येईल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने समाधानी राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.
धनु राशिभविष्य (Today Sagittarius Horoscope in Marathi)
कामाची वेळेनुसार छानणी करावी लागेल. जबाबदारी लक्षात घेऊन वागावे. राग आवरता घ्यावा लागेल. कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी. प्रवासात काळजी घ्यावी.
मकर राशिभविष्य (Today Capricorn Horoscope in Marathi)
धार्मिक स्थळांना भेट द्याल. तात्विक विचार मांडाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळवाल. थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल. क्षमाशीलतेने वागाल.
कुंभ राशिभविष्य (Today Aquarius Horoscope in Marathi)
दिवसभर कामाचा ताण राहील. बौद्धिक ताण जाणवेल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. इतरांच्या मताचा विचार करावा. योग्य संधीची वाट पहावी.
मीन राशिभविष्य (Today Pisces Horoscope in Marathi)
बदलीची चिन्हे दिसतील. तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल. कामात उर्जितावस्था येईल. वैचारिक सुसूत्रता ठेवावी. जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
