Today Horoscope 10th November 2024: आज १० नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल पक्षाची नववी तिथी आणि रविवार आहे. नवमी तिथी रविवारी रात्री ९ वाजून ०२ मिनिटांपर्यंत राहील. तर दुपारी १ वाजून ४२ मिनिटांपर्यंत ध्रुव योग राहील. रविवारी दुपारी ११ वाजेपर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असेल, त्यानंतर शतभिषा नक्षत्र दिसेल. याशिवाय 10 नोव्हेंबरला अक्षया नवमी आहे. आज राहू काळ दुपारी ४ वाजून ०९ मिनिटांनी सुरु होईल ते सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय चंद्र आज कुंभ राशीत प्रवेश करेल.

विशेष म्हणजे आज १० नोव्हेंबरला अक्षया नवमी आहे. य नवमीला आवळा नवमी असेही म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, तसेच प्रभु विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. आजच्या या शुभ दिनी तुमच्या राशीच्या नशिबात काय लिहून ठेवलेय पाहूया…

Sun-Saturn conjunction in 2025
२०२५ मध्ये सूर्य-शनीची युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक क्षेत्रात यश
lord hanuman favourite zodiac signs these horoscope will shine in new year 2025
२०२५मध्ये बजरंगबलीच्या कृपेने या राशींचे नशीब पलटणार! मिळेल…
Kanya Rashifal 2025
नववर्षात कन्या राशीच्या लोकांच्या व्यवसाय आणि करियरवर होईल वाईट परिणाम? जाणून घ्या कसे जाईल २०२५?
navpancham yog in kundali
शुक्र-गुरू बनवणार नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा
Lucky Numerology 2025
Lucky Numerology 2025: ‘या’ तिथीला जन्मलेल्या लोकांचा नववर्षात होणार भाग्योदय, बँक बॅलन्स वाढणार, नोकरीत मिळणार यश
shani created Shash Mahapurush Rajyog after 30 years
३० वर्षानंतर शनि बनवणार शश पंचमहापुरुष राजयोग; ‘या’ तीन राशींचे लोक होतील गडगंज श्रीमंत
8 December Aries To Pisces Horoscope Today
८ डिसेंबर पंचांग: कोणाला होईल अचानक धनलाभ ते कोणाचा वाढेल ताण; जन्मराशीनुसार आजचा रविवार १२ राशींसाठी कसा असणार?
7 December astrological predictions for zodiac signs
७ डिसेंबर पंचांग: धनिष्ठा नक्षत्रात १२ राशींवर होणार सुखाचा वर्षाव; पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय खास?
shukra shani Yuti 2024 in kumbha rashi horoscope
shukra-shani Yuti : २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींवर धन-सुखाची बरसात; शुक्र-शनी युतीने प्रेमात यश अन् नोकरी, व्यवसायातून मिळेल बक्कळ पैसा

१० नोव्हेंबर पंचांग: अक्षय नवमी विशेष राशीभविष्य (Akshaya Navami 2024 10th November Horoscope)

मेष:- मनातील जुनी इच्छा पूर्ण कराल. महिला मनाजोगी खरेदी करतील. गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. सामाजिक स्तरावर मान मिळेल.

वृषभ:- कामाच्या ठिकाणी अति घाई करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. व्यावसायिक ठिकाणी नवीन योजना आमलात आणाल. सहकार्‍यांची मने जिंकून घ्याल.

मिथुन:- आजचा दिवस मनाजोगा जाईल. आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल. धार्मिक स्थळी मन रमेल. दानधर्म कराल. उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल.

कर्क:- गूढ गोष्टी जाणून घ्याल. मानसिक चंचलता जाणवेल. भावनेला आवर घालावी लागेल. अति विचार करत बसू नका. अनपेक्षित लाभाची शक्यता.

सिंह:- काही सकारात्मक बदल घडून येतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील कडवटपणा दूर होईल. काही नवीन मार्ग सापडतील. जनसंपर्कात वाढ होईल.

कन्या:- खोटी स्तुति करणार्‍यांपासून सावध राहावे. आपले निर्णय आपणच घ्यावेत. इतरांवर फार विसंबून राहू नका. बुद्धीला योग्य मार्गाला लावावे. वादाचे प्रसंग टाळावेत.

तूळ:- आनंदाची अनुभूति मिळेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वातावरण सकारात्मक राहील.

वृश्चिक:- कुटुंबासमवेत फिरायला जाल. दिवस आनंदात घालवाल. घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल. प्रवास मजेत पार पडेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

धनू:- जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण कराल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील. भावंडांशी संबंध सुधारतील. शेजार्‍यांना मदत कराल.

हेही वाचा – बुध ग्रहाची उलटी चाल, २६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना करेल श्रीमंत! नोकरी व्यवसायात मिळेल यश अन् बक्कळ पैसा

मकर:- बोलण्यात गोडवा राखून कामे करून घ्याल. आळस झटकावा लागेल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो.

कुंभ:- मानसिक अस्थिरता दूर होईल. मनाला येईल तसे वागाल. आज समाधानाला अधिक महत्त्व द्याल. ध्यान धारणेला प्राधान्य द्यावे. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

मीन:- अति विचारात वेळ वाया घालवू नका. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. परदेशी भाषा शिकण्याची आवड निर्माण होईल. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत . आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )

Story img Loader